पारनेर तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील पारनेर,सुपा,जवळा, निघोज,कान्हूर पठार,टाकळी ढोकेश्वर,जामगाव...
पारनेर तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील पारनेर,सुपा,जवळा, निघोज,कान्हूर पठार,टाकळी ढोकेश्वर,जामगाव, संगविसूर्या,राळेगण थेरपाळ,गुणोरे,गाजीभोयरे,वडुले,पिंपरीजलसेन,अळकुटी, शिरपूर,वडनेर,कुरुंद, वाळावने,रायतले,रांजणगाव मशीद आदी गावांसह परिसरात रविवारी (दि.५)सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.शिरापुर मध्ये घराचे पत्रे उडून व भिंत पडल्याने घरातील प्रकाश पवार, विजया पवार व त्यांची लहान मुलगी साक्षी पवार हे जखमी झाले.तसेच रखमा उचाळे,बाळू खामकर,शांताराम खामकर, खंडू उचाळे या शेतकऱ्यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी जि. प. सदस्य सुजित झावरे ,माजी जि. प.सदस्य मधुकर उचाळे,पंचायत समिती सदस्य डॉ.भास्कर शिरोळे, सरपंच भास्कर उचाळे,उपसरपंच संतोष शिनारे आदींनी केली आहे










