दुरुस्तीनंतर रेल्वे वाहतूक सुरळीत अहमदनगर :अहमदनगर शहराला मुळा धरणातून पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन शनिवारी (दि.१८) सकाळी १0.३0 वाज...
दुरुस्तीनंतर रेल्वे वाहतूक सुरळीत
अहमदनगर :अहमदनगर शहराला मुळा धरणातून पाणी पुरवठा करणारी पाइपलाइन शनिवारी (दि.१८) सकाळी १0.३0 वाजण्याच्या सुमारास फुटल्याने सावधानतेचा इशारा म्हणून काही काळ रेल्वेमार्ग बंद ठेवण्यात आला होता. मात्र, काही वेळाने या रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली,
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर शहराला मुळा धरणातून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पाण्याच्या उच्च दाबाने विळदजवळ फुटली. यामुळे जवळूनच जाणार्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने हा मार्ग काही काळ बंद करण्यात आला होता. तसेच ज्या लोहमार्गावर पाण्याच्या प्रवाहामुळे नुकसान झाले होते, ते काम तातडीने पूर्ण करून हा मार्ग तातडीने सुरू करण्यात आला. पाण्याच्या प्रवाहामुळे रेल्वे रुळावरून पाणी वाहू लागल्याने रुळाखालील माती खचल्याने रेल्वे रूळ खचला होता. ही बाब रेल्वे प्रशासनाच्या लक्षात येताच हे काम तातडीने हाती घेऊन पूर्ण करण्यात आले. या कालावधीत मनमाडकडून येणारी रेल्वे काही काळ थांबविण्यात आली होती.पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जाऊन जवळच्या शेतात साचले होते तसेच या परिसरातून जाणारे दोन्ही बाजूचे ओढेही भरून वाहू लागले.











