पावसात हे डांबरीकरण सुरू असल्याने स्थानिकांनी संबंधित कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह महापौर अभिषेक कळमकर यांच्या प्रभागात गेल्या दोन द...
पावसात हे डांबरीकरण सुरू असल्याने स्थानिकांनी संबंधित कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
महापौर अभिषेक कळमकर यांच्या प्रभागात गेल्या दोन दिवसांपासून रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे. ऐन पावसात हे डांबरीकरण सुरू असल्याने स्थानिकांनी संबंधित कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. रविवारी सायंकाळी पावसाच्या अगोदर दोन तास गायकवाड कॉलनीतील रस्त्याचे डांबरीकरण झाले. या रस्त्यावर मोठय़ाप्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे हे किती काळ टिकेल याबाबत शंका उपस्थित होऊ लागल्या आहे. काही रस्त्यांवर एका बाजूचे डांबरीकरण झाले आहे, तर दुसरी बाजू तशीच ठेवली आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेचा कचरा न उचलता व रस्त्यावरील धूळ न काढता हे डांबरीकरण होत आहे










