Archive Pages Design$type=blogging

.सोनोग्राफीचालक आजपासून बेमुदत संपावर

.सोनोग्राफीचालक आजपासून बेमुदत संपावर अहमदनगर :पुण्यातील डॉक्टरवर अन्यायकारकपणे झालेल्या कारवाईविरोधात सरकारकडे दोन महिने रेडीओलोजी सं...

.सोनोग्राफीचालक आजपासून बेमुदत संपावर
अहमदनगर :पुण्यातील डॉक्टरवर अन्यायकारकपणे झालेल्या कारवाईविरोधात सरकारकडे दोन महिने रेडीओलोजी संघटनेने दाद मागूनही न्याय मिळालेला नाही. न्याय मिळवण्याचे सर्व मार्ग संपल्यामुळेच रुग्णसेवेची काळजी वाहणार्‍या राज्यभरातील डॉक्टरांना टोकाची भूमिका घेणे भाग पडत आहे. पुण्यातील बेमुदत संपाला सहा दिवस झाले, संपूर्ण राज्यात सोमवारपासून (दि. २0 जून) सोनोग्राफी बेमुदत बंद होणार आहे. सोनोग्राफी व्यतिरिक्त इतर सुविधा रुग्णांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. नगरमधील सोनोग्राफीचालक या बेमुदत संपात सहभागी होणार असल्याची माहिती इंडियन रेडिओलॉजी अँण्ड इमेजिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. धनंजय वाघ व सचिव डॉ. संदीप वाबळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे की, लिंगनिदान कायद्यातील हास्यास्पद आणि अन्यायकारक त्रुटीनुसार गर्भवतीची सोनोग्राफी करतांना भरावयाच्या फॉर्ममधील कुठलीही क्षुल्लक चूक आणि प्रत्यक्ष लिंगनिदानासारखे नृशंस गुन्हा या दोनहीसाठी समान शिक्षेची तरतूद आहे. कायदा राबवण्याचा मूळ उद्देश लिंगनिदानातून होवू शकणार्‍या स्त्री भूण हत्या थांबाव्यात हा आहे, अशी काळी कृत्ये करणार्‍या डॉक्डरांना पकडण्यासाठी स्टिंग ऑपरेशन हा सर्वोत्तम मार्ग आहे. परंतू तसे न करता फक्त वर नमूद केलेल्या
त्रुटीचा व कायद्यातून मिळालेल्या अर्मयाद अधिकारांचा गैरवापर केला जातो. तडकाफडकी मशीन सील करणे, कायद्याचा कुठल्याही कलमांचा भंग केल्याबद्दल फौजदारी खटला दाखल करणे, ज्यातून डॉक्टरांना तुरुंगवासही घडू शकतो. राज्यात आजपर्यंत कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या एकूण खटल्यापैंकी ९८ टक्के खटले फक्त किरकोळ कागदोपत्री चुकांसाठी आहेत, लिंग निदानसाठी नाहीत! रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्याचा प्रय▪सर्वच डॉक्टर करतात. पण अनावधानाने राहून गेलेल्या एखाद्या चुकीसाठी एवढी भयंकर शिक्षा होते. हा अन्याय दुर व्हावा यासाठी संपावर जात असल्याचे ते म्हणाले.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: .सोनोग्राफीचालक आजपासून बेमुदत संपावर
.सोनोग्राफीचालक आजपासून बेमुदत संपावर
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhrSdr-SWcaZCFB5W0zoN_EscHjlJgDQCXhIavWzElSYy9ZDSalO-c-GfMLMZFLt3xZrgt2xqEEy-Qmw2sOKhp0i9b124JURO7hyphenhyphenKIF1lFebiUiZ_G-WdHvfi-9JPVvXQnRbf4_iCVkkfgE/s1600/2.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhrSdr-SWcaZCFB5W0zoN_EscHjlJgDQCXhIavWzElSYy9ZDSalO-c-GfMLMZFLt3xZrgt2xqEEy-Qmw2sOKhp0i9b124JURO7hyphenhyphenKIF1lFebiUiZ_G-WdHvfi-9JPVvXQnRbf4_iCVkkfgE/s72-c/2.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/06/blog-post_766.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/06/blog-post_766.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago