भगवान गडावर पुन्हा दसरा मेळावा साजरा करावा वंजारी समाज बांधवांची मागणीनाशिक : दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र भगवान गड...
भगवान गडावर पुन्हा दसरा मेळावा साजरा करावा
वंजारी समाज बांधवांची मागणीनाशिक : दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र भगवान गडावर दसरा मेळावा होत असतो. परंतु तो यावर्षी होणार नाही आणि झाला तरी कोणत्याही राजकीय नेत्यांची भाषणे, मार्गदर्शन होणार नसल्याचा निर्णय गडाचे महंत डॉ. नामदेव महाराज यांनी घेतला आहे. त्यामुळे पूर्वपरंपरा लाभलेला व संत भगवान बाबांनी सुरू केलेला दसरा मेळावा गडावर व्हावा व त्यास ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मार्गदर्शन करावे, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. भगवान गड हे राज्यातील वारकरी संप्रदायाचे मोठे आध्यात्मिक केंद्र असून वंजारी समाजासह अठरा पगड जातींना बरोबर घेऊन भगवान बाबांनी उपेक्षितांना मार्गदर्शन केले. परंतु गडाच्या महंतांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे दसरा मेळाव्यात कुणीही राजकीय नेत्यास मार्गदर्शन करू न देण्याच्या निर्णयाने समाजबांधव संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे दसरा मेळावा व्हावा व त्यास मुंडे यांनी मार्गदर्शन करावे, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी वंजारी सेवा संघाचे प्रदेश सरचिटणीस पुरुषोत्तम काळे, दत्तुभाऊ खांडखे आदींसह समाजबांधव उपस्थित होते
| . |









