Archive Pages Design$type=blogging

दुष्काळाने हैराण शेतकरी पुन्हा उभारी घेण्याच्या तयारीत

दुष्काळाने हैराण शेतकरी पुन्हा उभारी घेण्याच्या तया रीत गेल्या दोन तीन वषार्ंपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे मेटकुटीस आलेला शेतकरी चालूवर...

दुष्काळाने हैराण शेतकरी पुन्हा उभारी घेण्याच्या तयारीत
गेल्या दोन तीन वषार्ंपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे मेटकुटीस आलेला शेतकरी चालूवर्षी दुष्काळामुळे पुरता हैराण झाला आहे. तरीही पुन्हा या दुष्काळावर मात करत नवीन अपेक्षेने आपल्या काळ्या आईची सेवक करून पुन्हा उभारी घेण्याच्या तयारीला लागला आहे. गेल्या काही वषार्ंपासून निसर्गाचे चक्र बदलल्यामुळे कमी पाऊस, कधी अवेळी पाऊस तर कधी गारपीट, यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतीच्या उत्पन्नावर मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण, घराचे बांधकाम अशी विविध दिवास्वप्न पाहून शेतीत राबणार्‍या शेतकर्‍याचा स्वप्नभंग झाला. दरवर्षी नुकसान होऊनही निराश न होता चालूवर्षी तरी चांगला पाऊस होऊ पिके येतील, या आशेने भर उन्हात आपल्या काळया आईची नांगरणी करत आहे व शेतीच्या उन्हाळी मशागतीवर भर देत आहे. मागील दोन तीन वर्षांत पाऊस कमी झाला. वादळी वारे, अवकाळी पाऊस व गारपीट, यामुळे हातात आलेली पिके वाया गेली. शेतीवर झालेला खर्चही पदरी पडला नाही. कधीही ऊसतोडणीसाठी न जाणारे शेतकरी यावर्षी आर्थिकदृष्ट्या खचल्याने व मुक्या जनवरांच्या चार्‍यासाठी ऊसतोडण्यासाठी कारखान्यावर गेला होता. आता गळीत हंगाम संपल्यानंतर गावाकडे परतलेला शेतकरी शेतीच्या कामाला ज़ुंपला आहे. सध्या टॅक्ट्ररने जमीन नांगरणीसाठी ८५0 ते ९00 रुपये एकरी द्यावे लागतात. यामळे काही शेतकरी दोन बैली तर काही चार बैलाने नांगर धरत आहेत. शेणखत टाकणो, नांगरणी करणो, कुळवणी करणो या कामात लक्ष देत असून, चालू वर्षी तरी निसर्ग साथ देईल, या आशेवर उन्हाचा विचार न करता शेतात राबत आहे. जून महिना सुरू झाल्याने आता बळीराजा चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: दुष्काळाने हैराण शेतकरी पुन्हा उभारी घेण्याच्या तयारीत
दुष्काळाने हैराण शेतकरी पुन्हा उभारी घेण्याच्या तयारीत
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEilFGhVKT-yjxtQcrhnJOgWr_NAK9oaVghrSs2n2-5xe1L0EMj0opeKzHm7ywSUefEqp9OScOwciVI49NTFLvtIDtQbpVmmCqXpK3TbMWqfeBgGqeNYZWqpmFjc91LKvwLjzO4YWdSe2CPW/s1600/dus.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEilFGhVKT-yjxtQcrhnJOgWr_NAK9oaVghrSs2n2-5xe1L0EMj0opeKzHm7ywSUefEqp9OScOwciVI49NTFLvtIDtQbpVmmCqXpK3TbMWqfeBgGqeNYZWqpmFjc91LKvwLjzO4YWdSe2CPW/s72-c/dus.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/06/blog-post_78.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/06/blog-post_78.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago