खा.गांधींनी बजावली कावरेंना शिस्तभंगाची नोटीस भाजपचे शहराध्यक्ष खा.दिलीप गांधी यांनी नगरसेवक दत्तात्रय कावरे यांना शिस्तभंगाची नोटीस ब...
खा.गांधींनी बजावली कावरेंना शिस्तभंगाची नोटीस
भाजपचे शहराध्यक्ष खा.दिलीप गांधी यांनी नगरसेवक दत्तात्रय कावरे यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, महापौर व उपमहापौर पदासाठी पक्षाच्या इच्छुक उमेदवाराची यादी गटनेता या नात्याने तुम्ही सादर करणे पक्ष घटनेनुसार बंधनकारक होते. परंतु तसे न करता पक्षातील नगरसेवकांना तसेच पदाधिकार्यांना विश्वासात न घेता परस्पर दुसर्या पक्षाच्या नगरसेवक व नेत्यासोबत पद वाटपासंदर्भात बोलणी केली. महापौर पदासाठी पक्ष नगरसेवकाव्यतिरिक्त तिर्हाईत उमेदवारास मतदान करण्यास नगरसेवकांवर दबाव आणला व आर्थिक लाभासाठी तसेच पदाच्या लालसेने पक्षांतर्गत नगरसेवकांचा स्वतंत्र गट निर्माण करण्याचा प्रय▪केला. तुमच्याविरुद्ध गटनेते बदलण्याचा ठराव बहुमताने संमत झाल्यावरही त्या ठरावास न जुमानता नूतन गटनेत्याने काढलेल्या पक्षादेशाविरोधात भाजप व्यतिरिक्त अन्य उमेदवारास मतदान करण्याचा पक्षादेश प्रसिद्ध केला. हा प्रकार गैरवर्तणुकीचा असून, या नोटीसीने आपण उपमहापौर पदाचा दाखल केलेला अर्ज मागे घेण्याचे बजावण्यात आल्याचे म्हटले आहे. हा आदेश न पाळल्यास पक्षादेशाचे पालन करण्यात कसूर ठेवल्याप्रकरणी तुमच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे










