मान्सूनची केरळात वर्दी चातकाप्रमाणे पावसाची वाट बघणार्या देशभरातील नागरिकांची प्रतीक्षा संपविताना मान्सूनने अखेर बुधवारी केरळात प्रवेश क...
मान्सूनची केरळात वर्दी
चातकाप्रमाणे पावसाची वाट बघणार्या देशभरातील नागरिकांची प्रतीक्षा संपविताना मान्सूनने अखेर बुधवारी केरळात प्रवेश केला असून हवामान विभागानेही याची अधिकृत घोषणा केली आहे. यंदा तब्बल सात दिवस उशिराने केरळात दाखल झालेल्या मान्सूनची पुढील वाटचाल अपेक्षेप्रमाणे झाल्यास तीन दिवसांत तो महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे. याशिवाय येत्या दोन दिवसांत राज्यातील विविध ठिकाणी पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.खरीप पेरणीसाठी अत्यावश्यक असलेल्या मान्सूनच्या केरळातील आगमनाच्या वार्तेने राज्यातील शेतकरी सुखावला आहे