मॉन्सून लांबल्याने खरीप पेरण्या खोळंबल्या रखरखत्या उन्हात शेतीची मशागत करून यावर्षी चांगले उत्पन्न होईल व कर्जाचा डोंगर उतरेल,या अपेक्...
मॉन्सून लांबल्याने खरीप पेरण्या खोळंबल्या
रखरखत्या उन्हात शेतीची मशागत करून यावर्षी चांगले उत्पन्न होईल व कर्जाचा डोंगर उतरेल,या अपेक्षेने कामाला लागलेल्या शेतकर्यांना सुरुवातीलाच निराशेला सामोरे जावे लागले. मृग नक्षत्राचे दहा ते बारा दिवस संपले तरी मान्सून सक्रिय न झाल्याने शेतकर्यांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. मॉन्सून दाखल झाल्याशिवाय पेरण्या न करण्याचे सूचक आवाहन सोशल मीडियावरून कृषी विभागाकडून शेतकर्यांना सातत्याने करण्यात येत आहे. यामुळे शेतकर्यांनी खरिपातील पेरणीची लगबग तूर्तास थांबविली आहे. मृग नक्षत्रात बियाणांची पेरणी व्हावी, यासाठी जवळपास ९0 टक्के शेतकर्यांनी पेरणीस सुरवात केली पण अनुकूल पाऊस न झाल्याने पेरणी थांबवली आहे.भुतकाळातील कटू आठवणी विसरून नवे स्वप्न उराशी बाळगून येणारे दिवस तरी सुखासमाधानाने जाईल. व संकटात सापडलेल्या बळीराजाला यावर्षी तरी दिलासा मिळेल, असे वाटत असले, तरी बळीराजाच्या हातात पावसाची वाट पाहण्याखेरीज दुसरा पर्याय नाही. नापिकीमुळे झालेले कर्जाचे ओझे विसरून बळीराजाने बी-बियाणांची जुळवाजुळव करून शेतीच्या कामाला लागला. परंतु सुरुवातीपासूनच निर्सग हुलकावणी देत असल्याने शेतकर्यांचे अवसानच गळाले आहे. शेतात केलेल्या पेरणीला मुबलक पाणी न मिळाल्याने शेतकर्यांना पुन्हा दुष्काळ पडण्याची वाटत आहे. तसेच दुबार पेरणीसाठी बियाणो कुठून आणणार, हा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे










