Archive Pages Design$type=blogging

आपत्ती व्यवस्थापनाबाबत कुचराई सहन करणार नाही

आपत्ती व्यवस्थापनाबाबत कुचराई सहन करणार नाही अहमदनगर :शहरात आपत्ती व्यवस्थापनाची कामे वेगात करण्यात यावीत यामध्ये कुचराई केल्यास सहन केल...

आपत्ती व्यवस्थापनाबाबत कुचराई सहन करणार नाही
अहमदनगर :शहरात आपत्ती व्यवस्थापनाची कामे वेगात करण्यात यावीत यामध्ये कुचराई केल्यास सहन केले जाणार नाही. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना आयुक्त दिलीप गावडे यांनी दिल्या आहेत.
आयुक्त गावडे यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत मनपा अधिकार्‍यांची बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त अजय चारठाणकर, सहा. आयुक्त ए.डी. साबळे, परिमल निकम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉ. पैठणकर, प्र. शहर अभियंता व्ही.जी. सोनटक्के, आपत्तकालीन व्यवस्थापन प्रमुख आर. जी. सातपुते, सहा. नगरकरचनाकार श्री. जोशी, सर्व प्रभाग अधिकारी आदी अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये नैसर्गिक आपत्ती, पूर प्रतिबंधात्मक व आपत्ती व्यवस्थापन उपाय योजनेबाबत माहिती देण्यात आली. तसेच धोकादायक इमारतींबाबत पब्लिक नोटीसा देणे, शहर अभियंता व वॉर्ड ऑफिसर यांनी एकत्रित कर्मचार्‍यांच्या नेमणुका करणे, सर्व तुटलेली चेंबर्सची झाकणे बसविणे, सर्व ड्रेनेज, गटारींची दुरुस्ती करुन साफसफाई करणे, रस्त्यावरील अनावश्यक मटेरिअल उचलून घेणे, खड्डे बुजविणे, संपूर्ण शहराची साफसफाई करणे, आपत्ती व्यवस्थापन कक्षाकरिता नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांची नावे व फोन नंबर प्रसिध्द करणे, मनपाचे मुख्य ऑफिसमध्ये कंट्रोल रुम करणे इत्यादी सूचना देण्यात आल्या.
संभाव्य पुरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या निवार्‍यासाठी शाळा, मंगल कार्यालये याठिकाणी नागरिकांना हलविण्यात यावे व त्याबाबत शाळा, मंगल कार्यालये इत्यादींना पत्र देण्यात यावेत. तसेच सखल भागात किंवा घरामध्ये पाणी शिरल्यास युनिट तयार ठेवणेबाबत प्रभाग अधिकार्‍यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. शहरातील मोठे नाले व छोटे नाले यांचे सफाईचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे.
तसेच सदर बैठकीत अधिकार्‍यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रत्येक विभागाच्या कर्मचार्‍यांनी जास्तीत जास्त ५ तारखेपर्यंत कामे पूर्ण करणेबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच कावीळ, गॅस्ट्रो आणि स्वाईन फ्ल्यू आदी रोगांपासून सावध राहण्यासाठी पावसाळ्यात काय उपाय योजना करता येतील यादृष्टीने चर्चा करण्यात आली

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: आपत्ती व्यवस्थापनाबाबत कुचराई सहन करणार नाही
आपत्ती व्यवस्थापनाबाबत कुचराई सहन करणार नाही
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgllbdHN963DD3UCT-dXMQm8rrB4DT3EZ_bCons_omJ3qhv1W7ekKvVDNuYz6gwhZL3rNu3LzlHMg02GE_Q91UhFUGKQCkqDRolwehKNRYY-BfRjRfSXKdxpOSke4tYBHXCS1un-J-waHLZ/s1600/12423.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgllbdHN963DD3UCT-dXMQm8rrB4DT3EZ_bCons_omJ3qhv1W7ekKvVDNuYz6gwhZL3rNu3LzlHMg02GE_Q91UhFUGKQCkqDRolwehKNRYY-BfRjRfSXKdxpOSke4tYBHXCS1un-J-waHLZ/s72-c/12423.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/06/blog-post_81.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/06/blog-post_81.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago