युनिटच्या आकडेवारीत गोंधळ करंजी पाथर्डी तालुक्यात घरगुती वीजग्राहकाला दर महिन्याला येणारे विजेचे बील आणि अचानक दोनशे रुपयांचे बील दहा...
युनिटच्या आकडेवारीत गोंधळ
करंजी पाथर्डी तालुक्यात घरगुती वीजग्राहकाला दर महिन्याला येणारे विजेचे बील आणि अचानक दोनशे रुपयांचे बील दहा हजारापर्यंत पोहचले तर, ग्राहकांची भीती डोकेदुखीत वाढते याचा प्रत्यय करंजीमध्ये आला आहे.
करंजी येथील रावसाहेब केशव मोरे यांचे जुने मिटर खराब झाल्याने त्यांना नवीन मीटर बदलून देण्यात आले. जूनच्या पाचव्या महिन्यात मोरे यांचे चार युनिट पडलेले असताना, बिलावर मात्र ८२५ युनिट पडले असल्याचे दाखवत मोरे यांना ९७८0 रुपये बील आले. त्यामुळे गोंधळून गेलेले मोरे यांनी तत्काळ संबंधीत वीजकर्मचार्यांना भेटून मिटर तपासण्याची विनंती केली. त्यावर मिटरमध्ये चारच युनिट पडले असल्याचे वीज कर्मचार्यांनी सुद्धा सांगितले. मग ८२५ युनिट आले कुठून, ९७८0 रुपये बील अचानक आल्याने ते भरणार तरी कसे. अशाच प्रकारचे अनेक घटना या रिडिंग आणि युनिटच्या बाबत घडल्या आहेत. विवेक बाळासाहेब मोरे यांच्या देखील बिलामध्ये गडबड झाली आहे. नियमित बील भरणार्या वीजग्राहकांना वीज कंपनीने वाढीव बिले देण्याचा प्रय▪करु नये. अन्यथा पाथर्डी येथील कार्यालया समोर ग्राहकांसमेवत अमरण उपोषणास बसण्याचा इशारा छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक मोरे यांनी दिला आहे.
ज्या ग्राहकांची युनिट, वीजबिलाबाबततक्रारी असेल त्यांच्याशी मंगळवारी करंजी येथे येऊन कार्यालयात चर्चा करुन निश्चित मार्ग काढू असे कनिष्ठ अभियंता भूजबळ यांनी सांगितले
|









