भिंगारला मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अहमदनगर :संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान समितीतर्फे भिंगार येथील भृगऋषीगड (भिंगार ट...
|
भिंगारला मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
अहमदनगर :संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान समितीतर्फे भिंगार येथील भृगऋषीगड (भिंगार टेकडी) येथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. कॅंप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या हस्ते या केंद्राचे उदघाटन झाले. सुहास धीवर व सुभाष पवार आदी उपस्थित होते. मार्गदर्शन केंद्र दर रविवारी सकाळी १0 ते ११.३0 या वेळेत भृगऋषीगड येथे सुरू राहिल. सुशील थिगळे व रुपाली पाटोळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे. केंद्राच्या अधिक माहितीसाठी संतोष धीवर व सागर चाबुकस्वार यांच्याशी संपर्क साधावा.
|










