माणिकनगरमध्ये भरदिवसा घरफोडी अहदमनगर :नगर-पुणे महामार्गालगत असलेल्या माणिकनगर येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली. यावेळी चोरट्यांनी घरातील च...
माणिकनगरमध्ये भरदिवसा घरफोडी
अहदमनगर :नगर-पुणे महामार्गालगत असलेल्या माणिकनगर येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली. यावेळी चोरट्यांनी घरातील चांदीची नाणे व रोख रक्कम पळविली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, कायनेटीक कंपनीच्या मेटन्सविभागाचे असिटन्ट जनरल मॅनेजर अनिल फुलचंद सुरपुरे हे माणिकनगर परिसरात राहतात. ते नेहमीप्रमाणे कायनेटीक कंपनीत ड्युटीवर गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले पाच ते दहा ग्रॅम वजनाचे ३0 ते ३५ चांदीचे क्वॉईन वकपाटातील रोख रक्कम असा माल चोरुन नेला. सुरपुरे हे रात्री घरी आले असता त्यांना घरात चोरी झाल्याची समजले. त्यांनी याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यापूर्वीही माणिकनगरमध्ये चार ते पाच ठिकाणी भरदिवसा चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र याचा अद्यापपर्यत तपास लागलेला नसताना पुन्हा घरफोडीची घटना घडल्याने या भागात पोलिसांनी दिवसा गस्त सुरु करावी अशी मागणी नागरीकांमधून पुढे येत आहे