श्रीगोंदा मतदार संघातील गावातील झालेल्यानुकसानीचे पंचनामे करून उपाययोजना करणेबाबत... श्रीगोंदा तालुक्यात गेल्या दोन ...
श्रीगोंदा मतदार संघातील गावातील झालेल्यानुकसानीचे पंचनामे करून उपाययोजना करणेबाबत...
श्रीगोंदा तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून वादळ वारयासह पावसास सुरुवात झाली आहे. परंतु झालेल्या वादळाने अनेकांच्या घराचे पत्रे उडून गेले तसेच अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. तसेच अनेकांच्या अंगावर घराच्या विटा पडून जखमी झालेले आहेत. वेजेचे खांब पडले असल्याने जनतेचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच दुष्काळाणे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जाळून गेलेली आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने आमच्या खालील मागण्या मान्य कराण्यात याव्व्यात.
१) वादळ वारयाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी.२) जखमींना मोफत शासकीय उपचार व मदत मिळावी.३) वादळाने तुटलेले विजेचे खांब व तारा पूर्वरत करून वीजपुरवठा चालू करण्यात यावा.४) शेतकर्यांना बी-बियाणे व खते मोफत देण्यात यावे.५) शेतकऱ्यांची वीजबिले व पाणीपट्टी पूर्णपणे माफ करण्यात यावी.६) समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ज्यांना उस लागवड करायची त्या शेतकऱ्यांना साखर कारखान्याच्या माध्यमातून उस बेने देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा.वरीलप्रमाणे मागण्या मान्य करण्यात येऊन विविध उपाययोजनांद्वारे शासनाने मदत करावी.नायब तहसीलदार अल्हाट यांना देण्यात आले यावेळी हरिदास शिर्के (राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्रीगोंदा), सुदामराव नवले (उपाध्यक्ष अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी), अजित जामदार (उपा. अ.नगर राष्ट्रवादी), शरद जमदाडे (उपा. तालुका युवक राष्ट्रवादी), सादिकभाई जमादार(मा. नगरसेवक श्रीगोंदा न.पा), भीमराव लकडे, विवेक पालेकर, निवृत्ती खेतमाळीस आदी उपस्थित होते.










