दारू बंदी साठी महिला सरसावल्या प्रतिनिधी : पारनेर(सागर अतकर) पारनेर तालुक्यातील निघोज मधील दारूबंदीचा लढया नंतर तालुक्यातील गावांनी सुद्धा...
दारू बंदी साठी महिला सरसावल्या
प्रतिनिधी : पारनेर(सागर अतकर)
पारनेर तालुक्यातील निघोज मधील दारूबंदीचा लढया नंतर तालुक्यातील गावांनी सुद्धा आपला गाव हा व्यसनमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जवळा या गावामध्ये अवैध्य दारू धंदे, मटका व इतर सर्व अवैध्य धंद्यावर बंदी घालावी तसेच बेकायदेशीर धंदे करणाऱ्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी आमरण उपोषण करण्यात आले. अड. रंजनाताई गवांदे(दारूबंदी जिल्हाध्यक्ष नेत्या),रामदास घावटे,रामदास कवडे सर, रंजनाताई पठारे (जवळा दारूबंदी अध्यक्ष ) तसेच गावतील महिला व पुरुष यांच्यासह ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले. निघोजचे दारूबंदी चळवळीचे प्रणेते बबनराव कवाद यांनी म्हंटले कि जवळा ,निघोज तसेच आसपासच्या गावातील दारूबंदी व इतरत्र चालणारे अवैध धंदे बंद करणार असल्याचं यावेळी ते म्हणाले. अड रंजनाताई गवांदे यांनी सांगितले कि जवळा गावातील महिलांनी पुढाकार घेतला हि महत्वाची बाब आहेच पण तरुण वर्गाने यांस पाठींबा दिला हि महत्वाची बाब आहे. तसेच या आंदोलना मार्फत आम्ही जवळा व इतर गावची नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील गावे दारूमुक्त करणार आहोत असा ठाम निश्चय केला. सौ.रंजनाताई पठारे(दारूबंदी समिती जवळा अध्यक्ष ) सौ.विद्या सालके ( दारूबंदी समिती जवळा उपाध्यक्ष ) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सुलाबाई वैरागर,आशाबाई शिंदे,उषा साळवे,लता वाबळे,भारती खुपते,सुनील पठारे,संदीप सालके,गजानन सोमवंशी,गोरख सालके,संतोष सालके,भाऊसाहेब आढाव,पंढरीनाथ कवाष्टे,आदींसह मोठ्या संख्येने आमरण उपोषणात सहभागी झाले होते