सेनेचे पारडे जडच, महापौर-उपमहापौर निवडणूक अहमदनगर : महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार बनत असून सध्या...
सेनेचे पारडे जडच, महापौर-उपमहापौर निवडणूक
अहमदनगर : महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार बनत असून सध्या महापालिकेत राष्ट्रवादीच्या सहकार्याने भाजप सत्ता स्थापन करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे वेगळ्या समीकरणांचे गणिते आखली जात आहेत. मात्र या चर्चा केवळ दबावतंत्राचा भाग असल्याचे राजकीय वतरूळात बोलले जात आहे. सद्य स्थितीत शिवसेनेचे पारडे जड असून भाजपाला युतीसोबतच रहावे लागणार असल्याचे बोलले जाते. महापौर अभिषेक कळमकर व उपमहापौर सुवर्णाताई कोतकर यांच्या पदाचा कार्यकाळ ३0 जून रोजी संपत असून त्यासाठी २१ जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठी शिवसेनेने गेल्या महिन्याभरापासून नियोजनबध्द रणनिती आखत सत्ता स्थापनेकडे आगेकूच केली आहे. गेल्या तीन आठवय़ांपासून सेनेचे सर्व नगरसेवक मुंबईच्या शिवसेनेच्या मोठय़ा नेत्यांच्या हॉटेलवर असून सावेडी उपनगरातील नगरसेवकही त्यांच्यासोबत आहेत. शिवसेना-भाजप युती सत्ता स्थापनेसाठी शर्थीचे प्रय▪करीत असताना उपमहापौर पदावरून युतीत थोडेसे चिंतेचे वातावरण आहे. भाजपचे खा. दिलीप गांधी आपले पुत्र सुवेंद्र यांच्यासाठी आग्रही असल्याने सावेडी उपनगरातील नगरसेवकांनी याबाबीस तीव्र विरोध करीत हे पद सावेडी उपनगरात राहण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या पदासाठी भाजपचे अनुभवी नगरसेवक बाबासाहेब वाकळे हे प्रबळ उमेदवार मानले जातात. सावेडी उपनगरातील या नगरसेवकांच्या स्पष्ट भूमिकेनंतर व सेनेसोबत सहलीवर जाण्याच्या कृतीनंतर राष्ट्रवादीच्या सहकार्याने भाजपचाच महापौर होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र या चर्चा केवळ दबावतंत्राचा भाग असल्याचे बोलले जात असून सावेडी उपनगरातील नगरसेवकांनी आपली आग्रही भूमिका बदलावी यासाठीही या चर्चा सुरू असल्याचे समजते. मात्र तरीही सावेडी उपनगरातील नगरसेवक आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने भाजपअंतर्गत मतभेद पहावयास मिळत आहे. मात्र हे मतभेद फार काळ टिकणार नसून भाजपला सेनेसोबतच रहावे लागेल, असा अंदाज राजकीय सुत्रांकडून वर्तवला जात आहे. |










