रोजगार हमीच्या कामांवरील मंजुरांची संख्या घटली अहमदनगर/ रोजगार हमीवरील सुरु असलेल्या कामांवर एकाच आठवड्यात ५१८ मजुरांची घट न...
अहमदनगर/
रोजगार हमीवरील सुरु असलेल्या कामांवर एकाच आठवड्यात ५१८ मजुरांची घट नोंदवण्यात आली आहे. पावसाळा सुरु झाल्याने मजुरांनी रोजगार हमीच्या कामाकडे पाठ फिरविण्यास सुरूवात केल्याचे दिसत आहे. श्रीरामपूर तालुक्यात सर्वाधिक कमी मजूर आढळले. रोहयोच्या कामांची मागणी चांगलीच वाढली होती. ही मागणी पाहून प्रशासनाने मजुरांची क्षमता ही ५ लाखांवरून ५२ लाखांपर्यंत वाढवली. इतकी मोठी मजूर क्षमता असताना मजुरांनी मात्र या योजनेकडे पाठ फिरविण्यास सुरूवात केल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
खरीप-रब्बी हंगामाच्या कामांमुळे रोजगार हमीच्या कामांसाठी मजूर मिळत नव्हते. रोजगार हमीच्या कामांची वाढण्याची शक्यता असताना प्रत्यक्षात मात्र मजुरांची संख्या २0 हजाराच्याही आत आहे. गेल्या आठवड्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामासाठी ग्रामपंचायत व यंत्रणा मिळून एकूण २0 हजार ११९ मजुरांची उपस्थिती होती. चालू आठवड्यात या संख्येत ५१८ मजुरांची घट झाली आहे. या आठवड्यातील मजुरांची उपस्थिती ही १९ हजार ६0१ इतकी आहे.










