छत्रपती संभाजीराजे राज्यसभेवर मुंबई : छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वंशज, कोल्हापूरच्या राजघराण्याचे वारस छत्रपती संभाजीराजे भोसले यांच...
| छत्रपती संभाजीराजे राज्यसभेवर मुंबई : छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वंशज, कोल्हापूरच्या राजघराण्याचे वारस छत्रपती संभाजीराजे भोसले यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या कोट्यातून संभाजीराजेंची नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीमुळे कोल्हापूर परिसरामध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी संभाजीराजे यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. या वेळी ते भाजपामध्ये जाणार असे म्हटले जात होते. काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांशीही त्यांचे घनिष्ठ संबंध होते, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांना संधी दिली नव्हती. राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने संभाजीराजेंच्या नावाचा विचार केला नसावा, मात्र भाजपाने हेच हेरून संभाजीराजेंना राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवून छत्रपतींच्या वारसाला आपल्या बाजूला खेचण्यात यश मिळवले असल्याचे बोलले जात आहे |










