शेवगाव आरपीआयची ९ रोजी बैठक : बोरुडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या शेवगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांची विविध विषयांवर चर्चा...
शेवगाव आरपीआयची ९ रोजी बैठक : बोरुडे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या शेवगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांची विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी महत्वपूर्ण बैठक गुरुवार (दि. ९) रोजी दु. १ वाजता पैठण रोडवरील हॉटेल साईपूजा येथे होणार असल्याची माहिती आरपीआयचे शेवगाव तालुका प्रमुख विजय बोरुडे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, गेल्या अनेक महिन्यांपासून शेवगाव तालुक्यात कायदा व सुव्यवस्तेचा बोजवारा उडाल्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये वारंवार खोट्या गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ, अनेक गुन्ह्यांतील आरोपी राजरोसपणे फिरत असताना त्यांना अटक होत नाही. मुंगी येथील गोदावरी पात्रातून रात्रंदिवस होणारा बेकायदेशीर वाळूउपसा तत्काळ बंद करावा, या सह इतर ही काही महत्वपूर्ण विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. आरपीआय (आठवले गट) राज्य कार्यकारिणी सदस्य पवनकुमार साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या बैठकीत अनेक मान्यवर व पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीस शेवगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांसह फुले- शाहू - आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विजय बोरुडे, भाऊराव भोंगळे, राजू मगर, प्रवीण गायकवाड, राजू इंगावले, सुगंध खंडागळे आदींनी केले आहे










