केबल तुटल्याने पाथर्डीतील इंटरनेटसेवा विस्कळीत पाथर्डी : भारतीय दूरसंचार निगमची ओएफसी वायर तुटल्यामुळे तालुक्यातील बीएसएनएलचे सर...
|
|
पाथर्डी : भारतीय दूरसंचार निगमची ओएफसी वायर तुटल्यामुळे तालुक्यातील बीएसएनएलचे सर्व मोबाईल फोन व इंटरनेट सेवा बंद पडली. गुरुवारी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत बहुतेक राष्ट्रीयीकृत बँका, नागरी पतसंस्था, सेतू कार्यालये, एटीएम मशीन बंद पडल्याने जनजीवन ठप्प झाले होते. शहरात सर्वच इंटरनेट सेवा बंद आहे असे उत्तर मिळत होते.
भारतीय दूरसंचार निगमची ओएफसी वायर साकेगाव जवळ शेतात नांगरणी करणार्या ट्रॅक्टरमुळे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तुटली. त्यामुळे काही भागातील बीएसएनएलची सेवा बंद पडली. त्यांनतर काही वेळातच नगर तालुक्यातील कौडगाव येथे नगरहून पाथर्डीकडे येणारी ओएफसी वायर तुटली. त्यामुळे तालुक्यातील बीएसएनलचे सर्व मोबाईल व इंटरनेट सुविधा बंद पडली. विविध बँकेतील व्यवहार ठप्प झाले. स्टेट बँक ऑफ इंडिया,सेंट्रल बँक, महाराष्ट्र बँक, नगर अर्बन बँक, अहमदनगर सहकारी बँक विविध नागरी पतसंस्था, सेतू कार्यालये बंद पडले. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले. इंटरनेट सेवा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनल्याचे पहिल्यांदाच सर्वसामान्य माणसाला देखील जाणवले. बँकिंग सेवा बंद झाल्याने अनेकांचे आर्थिक नुकसानही झाले. वेळ वाया गेला. मनस्ताप सहन करावा लागला. चार ते साडेचार तास बीएसएनएलची सेवा बंद पडल्याने अनेक अडचणी उभ्या राहील्या. पाथर्डीचे उपमंडल अभियंता राधाकिसन सदामत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, साकेगाव व कौडगाव येथील ओएफसी वायर तुटल्यामुळे बीएसएनएलची सेवा बंद पडली होती. नगर येथून तांत्रिक अधिकारी व कर्मचार्यांनी तातडीने वायर जोडली. दुपारी सेवा पुन्हा सुरू झाली.