महापौर पदाची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार अहमदनगर: अहमदनगर महापालिकेची महापौर पदाची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार बनत चालली असून राजकीय...
महापौर पदाची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार
अहमदनगर: अहमदनगर महापालिकेची महापौर पदाची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार बनत चालली असून राजकीय पातळीवर सर्वत्र उलथापालथ सुरू आहे. सेना व भाजपा युतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने त्यांच्यातील रुसवे-फुगवे सुरूच असून युतीतील तणाव काय आहे. शिवसेनेने महापौर पदावर दावा केला असला तरी भाजपाने आघाडीच्या मदतीने महापौर पदासाठी स्वतंत्र उमेदवारी देण्याचे प्रय▪सुरू केले आहेत. महापौर पदासाठी शिवसेनेकडून सौ. सुरेखा कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार होता. मात्र युतीवर शिक्कामोर्तब न झाल्यामुळे आज अखेरच्या दिवशी अर्ज दाखल केला जाणार आहे. शिवसेना व भाजपा एकत्रित लढणार की स्वतंत्र ? तसेच आघाडीकडून कोणाचे उमेदवारी अर्ज दाखल होणार याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे










