१ लाख ३७ हजार रुग्णांना दृष्टिदान अहमदनगर :चार कामे केली तरी आठ ठिकाणी त्याची महती सांगणारी माणसे समाजात कमी नाहीत. या जोरावर ते अनेक प...
अहमदनगर :चार कामे केली तरी आठ ठिकाणी त्याची महती सांगणारी माणसे समाजात कमी नाहीत. या जोरावर ते अनेक पुरस्कारांनाही गवसणी घालीत असतात. पण पदरमोड करुन तेही गेली २५ वर्षापासून नि:स्वार्थ समाजसेवा करणारी जालिंदर बोरुडे सारखी दूरदृष्टीची माणसं विरळच. त्यांनी हजारो नेत्र शस्त्रक्रिया शिबिरे घेऊन १ लाख ३७ हजार ३३४ रुग्णांना दृष्टी मिळवून दिली. तसेच ५१,७00 जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला. त्यांचा हा विक्रमच म्हणावा लगोल. फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडेंचे गोरगरिब, दीन दुबळ्या व वंचित घटकांसाठी दृष्टीदानाचे कार्य प्रेरणादायीच आहे.
आजच्या दुष्काळी परिस्थितीत सुद्धा दुष्काळग्रस्त शेतकरी , कष्टकरी महिलांकडे शस्त्रक्रियेसाठी एवढी मोठय़ा रकमेची सोय होणे शक्य नसताना , ४५५0 दुष्काळग्रस्त कष्टकरी महिनांना या शिबिरीद्वारे मोफत शस्त्रक्रीया करुन नवी दृष्टी देण्याचे कार्य केले.
त्यांचा दिवस उगवतो तो शिबिराच्या चौकशीने, मोबाईलवर येणारे बहुतांश कॉलही तेच. जालिंदर बोरुडे यांनी नोकरी सांभाळत समाजसेवा चाललेली असते.जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रेरणा घेऊन आपली सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन व वंचित दुबळ्या घटकांसाठी काही तरी करण्याची तयारी ठेवून बोरुडे यांनी १९९१ साली नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करण्यास सुरुवात केली. तेंव्हापासून आजपर्यंत त्यांची ही या नावाने संस्था स्थापन केली आहे. त्यासाठी के. के. आय. बुधराणी हॉस्पिटलचे सहकार्य असते पण कोणाचे दान नाही किंवा अनुदान, खिशाला झळ देऊन त्यांचा हा कार्यक्रम चाललेला असतो.










