सत्कारासाठी हार-तुरे नको ; शालेय साहित्य द्या नूतन महापौरांचे आवाहन अहमदनगर :नगरकरांच्या मनात असलेली घटना घडली आहे. महापालिकेवर शिवसेनेचा भ...
सत्कारासाठी हार-तुरे नको ; शालेय साहित्य द्या
नूतन महापौरांचे आवाहन
अहमदनगर :नगरकरांच्या मनात असलेली घटना घडली आहे. महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. यामुळे नगकरांकडून मोठय़ा प्रमाणात सत्कार होऊ लागल्याने मी भारावून गेले आहे. नगरकरांनी सत्कारासाठीच्या महागड्या शाली व पुष्पगुच्छांचे मला शालेय साहित्यांची भेट दिल्यास या नवीन शैक्षणिक वर्षात गोरगरीब, गरजू, अनाथ आणि शिक्षणाच्या प्रक्रियेत आलेल्या विद्यार्थ्यांना ही शालेय साहित्यांची भेट मदत म्हणून देता येईल, असे प्रतिपादन नूतन महापौर सौ. सुरेखा कदम यांनी केले.
महापालिकेच्या महापौर म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या सौ. कदम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला असताना त्यांनी सत्कारात रमताना नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले याची आठवण ठेवून विद्यार्थ्यांना आपण काही मदत करु शकू का ? या विषयी आत्मचिंतन करत सत्काराप्रित्यर्थ नगरकरांनी शालेय साहित्यांची भेट द्यावी. या साहित्यातून मला शहरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मदत म्हणून देणे सोईचे होईल, असा विचार मांडला. या विचारामधून समाजाविषयी असलेली कणव स्पष्ट झाली.
त्या पुढे म्हणाल्या, माझी महापौर म्हणून बिनविरोध निवड झाल्यापासून सत्कार करणार्या हितचिंतक, नातेवाईक, नागरिक यांनी मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली. मोठे गुच्छ, शाली, पुष्पहार यासोबत पेढय़ांचे बॉक्स घेऊन सत्कारासाठी येणार्यांमुळे मला जबाबदारी वाढल्याचे प्रकर्षाने जाणवले. हार, गुच्छ, शाली यावर होणार्या खर्चाच्या रकमेइतकेच शालेय साहित्य मला सत्काराप्रित्यर्थ भेट म्हणून मिळाल्यास या साहित्याचा मी गोरगरिब विद्यार्थ्यांना मदत देण्यासाठी उपयोग करु शकेल. आपल्याकडून होणार्या सत्काराचा मी आदर आणि सन्मानच करते. मात्र या सत्काराप्रित्यर्थ शालेय साहित्यांची मागणी करण्याची माझी सद्भावना नगरकरांनी लक्षात घ्यावी. शालेय साहित्यांच्या मदतीमुळे विद्यार्थ्यांना मोलाचा आधार होईल. नगरकरांच्या आशिर्वादाने माझ्याकडे आलेल्या महापौरपदामुळे मी शहरातील विद्यार्थ्यांना मदत करु शकल्याचे समाधानही प्राप्त होईल, असे सौ. सुरेखा कदम यांनी सांगितले.
| ||||||









