Archive Pages Design$type=blogging

जिल्ह्यात डीजेच्या कर्कश आवाजाला बसणार लगाम !

जिल्ह्यात डीजेच्या कर्कश आवाजाला बसणार लगाम ! अहमदनगर :  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषणावर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हा...


जिल्ह्यात डीजेच्या कर्कश आवाजाला बसणार लगाम !
अहमदनगर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदूषणावर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने पाउले उचलली असून, एकूण ३७ प्राधिकार्‍यांची निवड करण्यात आली आहे. सी. डी. व डी. जे. च्या कर्कश आवाजावर यापुढे पोलिसांची करडी नजर राहणार असून, कर्कश आवाजाला लगाम बसणार आहे. केवळ नागरिकांची साधी तक्रार आल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याने यापुढे सी. डी. व डी. जे. हद्दपारीच्या मार्गावर आहे. लग्न समारंभ, वरात, उद््घाटने, मिरवणुका, यासाठी सी. डी. व डी. जे. च्या कर्कश आवाजाने मोठे ध्वनी प्रदूषण होत असल्याने यासाठी उच्च न्यायालयाने काही निकष जारी केले आहेत. त्यानुसार आता ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात पोलिस प्रशासनातर्फे एकूण ३७ प्राधिकार्‍यांची निवड करण्यात आली आहे व तसे अधिकार पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. नागरिकांची तक्रार आल्यास थेट कारवाई करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात पोलिस अधिकार्‍यांसह उपअधीक्षक व पोलिस ठाण्यांच्या प्रभारींना कारवाईचे थेट अधिकार देण्यात आले आहेत. ध्वनी प्रदूषण प्राधिकार्‍याचे नाव जाहीर करून नागरिकांसाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक , इमेल आयडी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ध्वनी प्रदूषण प्राधिकार्‍यांमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी , नगर शहर विभाग बजरंग बनसोडे, नगर ग्रामीण विभाग आनंद भोईटे, कर्जत विभाग विजय लगारे, शेवगाव विभाग - आनंद भोईटे (अतिरिक्त), श्रीरामपूर विभाग विवेक पाटील (अतिरिक्त), शिर्डी विभाग विवेक पाटील, संगमनेर विभाग अजय देवरे, कोतवाली पोलिस ठाण्याचे पो. नि. मालकर, तोफखान्याचे सपोनि. राहुल गायकवाड, भिंगार कॅम्पचे सपोनि विनोद चव्हाण, नगर तालुक्याचे परिविक्षाधीन सहाय्यक पोलिस अधीक्षक विशाल आनंद, एमआयडीसीचे सपोनि. राहुल पवार, पारनेरचे पोलिस निरीक्षक दिलीप पारेकर, सुप्याचे पोनि शाम सोमवंशी, कर्जतचे सपोनि अजित चिंतले, जामखेड पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र इंगळे, श्रीगोंद्याचे पोनि. साहेबराव कडनोर, बेलवंडीचे सपोनि. सचिन वांगडे, पाथर्डीचे पोनि. वसंत भोये, शेवगाव पोनि. सुरेश सपकाळे, नेवासा पोनि. संपत शिंदे, सोनई सपोनि. सचिन सानप, श्रीरामपूर शहर पोनि. दिलीप पवार, श्रीरामपूर तालुका सपोनि. किशोर परदेशी, राहुरी पोनि. प्रमोद वाघ, कोपरगाव पोनि. सुरेश शिंदे, कोपरगाव ग्रामीणचे पोनि. शहाजी नरसोडे, शिर्डीचे पोनि. प्रताप इंगळे, राहाता पोनि. सुरेश बेंद्रे, लोणी सपोनि. नितीन पगार, संगमनेर शहर पोनि. गोकुळ औताडे, संगमनेर तालुका पोनि. गोविंद ओमासे, घारगाव पोनि. दिलीप निघोट, अकोले पोनि. नारायण वाफारे, राज़ूरचे सपोनि. भरत जाधव, आश्‍वीचे सपोनि. राहुल पाटील आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी नियंत्रण कक्षाचे पोनि. राजेंद्र पडवळ यांचा समावेश आहे. पोलिस प्रशासनाच्या या कडक कारवाईमुळे यापुढे सी. डी. व डी. जे. च्या आवाजाला लगाम बसणार आहे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: जिल्ह्यात डीजेच्या कर्कश आवाजाला बसणार लगाम !
जिल्ह्यात डीजेच्या कर्कश आवाजाला बसणार लगाम !
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEins3JOyeo8mDkLem2Ajbn0-u5v9nNZjMeh7w8aDN-KlHCKG6rvB4tFIgKDhyphenhyphenblcY0ENczD8Vq61_lj0TuX8LBvCdn7IA6FlbrxaK5ocZ9mffR78cAk4g33p4j842qigDWDKgFiADTJ4nXK/s320/hqdefault.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEins3JOyeo8mDkLem2Ajbn0-u5v9nNZjMeh7w8aDN-KlHCKG6rvB4tFIgKDhyphenhyphenblcY0ENczD8Vq61_lj0TuX8LBvCdn7IA6FlbrxaK5ocZ9mffR78cAk4g33p4j842qigDWDKgFiADTJ4nXK/s72-c/hqdefault.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/06/blog-post_94.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/06/blog-post_94.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago