पारनेर तालुक्यात दारु विक्रेत्यांवर छापे अहमदनगर : पारनेर तालुक्यातील निघोज व जवळा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारु विक्रेत्या...
पारनेर तालुक्यात दारु विक्रेत्यांवर छापे
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील निघोज व जवळा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारु विक्रेत्यांवर धडक कारवाई करुन छापे टाकले. यावेळी ७ जणांवर कारवाई करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाने एकाचवेळी अवैध व्यवसायिकांविरुद्ध सुरु केलेल्या या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. ७) उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने केली.
निघोज येथे दारुबंदी करावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तक्रारी करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने निघोज व जवळा येथे एकाचवेळी छापे टाकले. या छाप्यात ४३ हजार ५00 रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे. आठ ठिकाणी छापे टाकून सात जणांवर कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकाच दिवशी एकाचवेळी पारनेर तालुक्यातील निघोज व जवळा येथे धडक कारवाई केल्याने अवैध व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.










