दिल्लीगेट परिसरात राडा अहमदनगर :नालेगाव परिसरात झालेल्या भांडणाची फिर्याद मागे घ्यावी याच्या कारणावरुन अजय म्हस्के याला वारुळाचा मारुतीला...
दिल्लीगेट परिसरात राडा
अहमदनगर :नालेगाव परिसरात झालेल्या भांडणाची फिर्याद मागे घ्यावी याच्या कारणावरुन अजय म्हस्के याला वारुळाचा मारुतीला जाणार्या रस्त्यावर चार ते पाच जणांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत अजय म्हस्के हा जखमी झाला असून त्याला उपचारार्थ सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत म्हस्के यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात पाच जणांविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. २) रात्री घडली. यावेळी दिल्लीगेट परिसरात पळापळ झाल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण पसरले होते.
याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, बालिकाश्रम रोड येथील जाधवमळा परिसरात राहणारे अजय म्हस्के यांनी वाघमारे व पवार यांच्याविरुध्द तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. सदरची फिर्याद मागे घ्यावी यासाठी म्हस्के यांना नालेगाव परिसरातील वारुळाचा मारुती रस्त्यावर गाठून शिवम पवार, सचिन वाघमारे, अक्षय धाडगे, सतीश वाघमारे, सुरेश पाटोळे (रा. बागरोजा हाडको) यांनी रिव्हॉलवरचा धाक दाखवून लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत म्हस्के हा गंभीर जखमी झाला. त्याला नगरच्या सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी रात्री १0 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नालेगाव व दिल्लीगेट परिसरात पळापळ झाली. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. परिसरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने फटाफट बंद करुन घेतली. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येवून बंदोबस्त वाढविला. मारहाण करणारे घटनेनंतर पसार झाले. याबाबत म्हस्के यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिसांनी पाच जणांविरुध्द मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.