१0४ नव्या ग्रहांचा शोध; काही जीवसृष्टीस अनुकूल! आतापर्यंत 4600 ग्रहांचा शोध!? वॉशिंग्टन : अथांग ब्रह्मंडामध्ये पसरलेल्य...
१0४ नव्या ग्रहांचा शोध; काही जीवसृष्टीस अनुकूल!
|
आतापर्यंत4600
|
| ग्रहांचा शोध!? वॉशिंग्टन : अथांग ब्रह्मंडामध्ये पसरलेल्या लाखो तार्यांमधील ग्रह शोधण्यासाठी 'नासा'ने पाठविलेल्या 'केपलर' या खगोलीय दुर्बिणीने १0४ नवीन ग्रहांचा शोध लावला आहे. यापैकी चार ग्रहांवर आपल्या पृथ्वीसारखा खडकाळ भाग आढळून आला आहे. त्यामुळे जीवसृष्टीच्या दृष्टिकोनातून हे ग्रह अनुकूल आहेत, असा दावा खगोलशास्त्रज्ञांनी केला आहे.२00९ मध्ये अंतराळातील नवीन ग्रहांचा शोध घेण्यासाठी 'नासा'ने 'केपलर' ही खगोलीय दुर्बिण अंतराळात पाठविली होती. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ४,६00 ग्रह खगोलशास्त्रज्ञांनी शोधून काढले आहेत. यापैकी २,३२६ ग्रहांच्या अस्तित्वावर संशोधकांनी शिक्कामोर्तब केले आहे.अमेरिकेतील एॅरिझोना विद्यापीठातील वैज्ञानिकांच्या नेतृत्वाखाली खगोलशास्त्रज्ञांनी याविषयीचे महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. 'नासा'च्या केपलर खगोलीय दुर्बिणीने ब्रह्मंडाचे रहस्य उलगडताना जवळपास १९७ नवीन ग्रह आढळून आले आहेत. यापैकी १0४ नवीन ग्रहांवर खगोलशास्त्रज्ञांनी शिक्कामोर्तब केले आहे. आपल्या सौरमंडळाच्या बाहेर वावरत असलेल्या या ग्रहांपैकी चार ग्रहांवर जीवनाची शक्यताही वैज्ञानिकांनी वर्तविली आहे. या ग्रहांमधील विविधता खूपच आश्चर्यकारक आहे, असे संशोधनात भूमिका बजावणारे हवाई विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ इवान सिनुकोफ यांनी म्हटले आहे. आम्ही पृथ्वीपेक्षा दुप्पट आकाराच्या अनेक ग्रहांचा शोध लावला आहे. हे ग्रह आपल्या उपग्रहाला अतिशय जवळून प्रदक्षिणा घालत आहेत. ग्रहांच्या तुलनेत या उपग्रहांचे तापमान एक हजार अंश सेल्सिअस इतके अधिक आहे, असे सिनुकोफ यांनी सांगितले. यापैकी चार ग्रह पृथ्वीप्रमाणे खडकाळ आहेत. या ग्रहांचा व्यास हा पृथ्वीपेक्षा २0 ते ५0 टक्के मोठा आहे. पृथ्वीपासून ४00 प्रकाशवर्षे दूर असलेल्या आपल्या तार्याभोवती ते प्रदक्षिणा घालत आहेत. यापैकी दोन ग्रहांच्या पृष्ठभागाचे तापमान हे पृथ्वीशी साम्य साधणारे आहे. उल्लेखनीय म्हणजे या ग्रहाचे उपग्रह हे आपल्या सूर्यापेक्षा थंड आहेत. त्यामुळे या ग्रहांवर जीवनाची शक्यता अधिक असल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. |










