नववीची परीक्षाही आता बोर्डाच्या धर्तीवर६00 विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित; राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना पूर...
राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती दिली जाते. साधारणत: हजार रुपये एका विद्यार्थ्याला मिळतात. मात्र, विद्यार्थ्यांची माहिती चुकीची दिली गेली अथवा बँक खात्याशी आधार लिंक झालेले नसल्यामुळे जिल्ह्यातील ६00 विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागले आहे. त्यांची माहिती त्वरित पंचायत समितीकडे सादर करण्याचे आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत, तसेच टंचाईग्रस्त तालुक्यातील मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. शाळांनी शुल्काचे चलन न भरलेल्या विद्यार्थ्यांची प्रतिपूर्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळाले नाही, तर याची पूर्णत: जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे. यासाठी दोन दिवसांच्या आत माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले.शिक्षणाधिकारी औताडे : शाळांना तत्पर राहण्याची सूचनानाशिक : मुख्याध्यापक सहविचार सभेत मार्गदर्शन करताना माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औता.डे दुसर्या छायाचित्रात उपस्थित मुख्याध्यापक. दहावी इयत्तेचा निकाल उंचावण्यासाठी अनेक शाळा विद्यार्थ्यांना नववीत अनुत्तीर्ण करतात. त्यामुळे दहावीच्या तुलनेत नववीत अनुत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षात घेऊन शासनाने आता नववीची परीक्षा बोर्डाच्या धर्तीवर घेण्याची भूमिका स्वीकारली आहे. शिक्षणमंत्र्यांनी या निर्णयाची अद्याप अधिकृत घोषणा केली नसली, तरी शिक्षणाधिकार्यांना तसा आदेश प्राप्त झाला आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांनी आज वार्षिक नियोजन पूर्वतयारी बैठकीत या परीक्षेसाठी तत्पर राहण्याची सूचना मुख्याध्यापकांना दिली.
माध्यमिक शिक्षण विभाग व मुख्याध्यापक संघाच्या वतीने गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. शिक्षणाधिकारी औताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यशाळेस जिल्ह्यातील अकराशे मुख्याध्यापक, उपशिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रसंगी औताडे यांनी शैक्षणिक धोरणांमधील महत्त्वाच्या बदलांवर प्रकर्षाने भाष्य केले. दहावीप्रमाणेच नववीची परीक्षा आयोजित करण्याचा मानस शासनाच्या विचाराधीन आहे. नववीची परीक्षा शाळांनी घ्यायची असली, तरी त्याची प्रश्नपत्रिका बोर्डाकडून मिळेल. त्यामुळे राज्यभर एकाच वेळी ही परीक्षा आयोजित करण्याचे संकेत मिळाले आहेत. बोर्डाची ही परीक्षा होण्यापूर्वी शाळांना नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घ्यावी लागेल. याची अधिकृत तारीख शाळांना लवकरच कळविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शाळांनी वार्षिक नियोजन करताना कोणत्या महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रीत करावे, याविषयी उपशिक्षणाधिकार्यांनी मार्गदर्शन केले. उपशिक्षणाधिकारी एस. जी. मंडलिक यांनी शैक्षणिक शुल्क नियमनासाठी आवश्यक शिक्षक-पालक संघाची कार्यकारिणी एक महिन्याच्या आत स्थापन करण्याचे निर्देश दिले. शिक्षक-पालक संघ स्थापन करताना नियम आणि निकष काय आहेत, याविषयी सविस्तर माहिती दिली, तसेच शाळेतील व्यवस्थापन समिती, पोषण आहार समिती, परिवहन समिती, माता-पालक संघ आणि विशाखा समिती यांची नियमित बैठक घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी उदाहरण दिले. विद्यार्थ्यांचे बँक खाते आधारलिंक करण्यासाठी ४0 विद्यार्थ्यांचा एक गट तयार करून तहसीलदार कार्यालयास कळवावे. या विद्यार्थ्यांंचे आधार कार्ड तयार करून ते खात्याशी जोडण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. नॅशनल मिन्सकम मेरीट शिष्यवृत्ती (एनएमएमएस) साठी पात्र विद्यार्थ्यांंची माहिती प्रत्येक शुक्रवारी तालुकास्तरावर पाठविणे बंधनकारक असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी दिली. त्याप्रमाणे अनुदानित शाळेतील २0 वर्षांंपूर्वीचे साहित्य निर्लेखित करण्यासाठी २६ ऑगस्टपर्यंंत मुदत दिली आहे. दि. २२ ते २७ ऑगस्ट दरम्यान इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील २१0 विद्यार्थ्यांंच्या बँक खात्यावर प्रत्येकी ५ हजार रुपये वर्ग करण्यात आहेत. या विद्यार्थ्यांंना इन्स्पायर अवॉर्ड उपक्रमात सहभाग नोंदविणे बंधनकारक असून, ज्या तालुक्यातून सर्वाधिक विद्यार्थ्यांंची नावे येतील, त्या शाळेत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी उपशिक्षणाधिकारी एस. जी. मंडलिक, आर. पी. पाटील, सुनीता धनगर, मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, एम. व्ही. बच्छाव, एस. टी. पिंगळे, राजेंद्र सावंत, एस. ए. पाटील, एस. बी. शिरसाठ, के. के. अहिरे, आर. डी. निकम, एस. के. सावंत उपस्थित होते
|










