केडगाव परिसरात ८ ते १५ फुटांची ५000 झाडे लावण्याचा नगरसेवक सातपुते यांचा संकल्प; अहमदनगर ; शिवसेनेचे नगरसेवक दिलीप सातपुते यांन...
केडगाव परिसरात ८ ते १५ फुटांची ५000 झाडे लावण्याचा नगरसेवक सातपुते यांचा संकल्प;
अहमदनगर ;
![]()
शिवसेनेचे नगरसेवक दिलीप सातपुते यांनी केडगाव परिसरात ८ ते १५ फुटाची ५000 झाडे लावून हिरवेगार करणाच्या संकल्प केला आहे. त्यासाठी ५00 झाडे दाखल झाली आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना सातपुते म्हणाले, आंध्र प्रदेश मधील ईस्ट गोदावरी जिल्ह्यातून ४00 एकरवर असणार्या रोपवाटिकेतून सप्तपर्णी, नीलमोहर, कदंबा बहावा, रेनट्री, शंकासूर, गुलमोहर अशी ८ ते १५ फुटाची मोठी झाडे मागवण्यात आली आहेत. ५000 झाडे लावण्याचा संकल्प असून त्यास मोठा कालावधी लागणार आहे. त्यामधील पहिली ५00 झाडे आली असून या आठवड्यात लिंक रोड व भूषण नगर परिसरात त्यांचे रोपन करण्यात येणार आहे. यामुळे लावलेले रोप / वृक्ष एका वर्षात मोठा होईल व त्यास ट्री गार्ड व सुरक्षा देण्याची गरज पडणार नाही.
|










