डॉ. कलाम यांच्या स्मरणार्थ १00 वृक्षांची लागवड; अहमदनगर- तरुणाईचे प्रेरणास्थान असलेले दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल...
डॉ. कलाम यांच्या स्मरणार्थ १00 वृक्षांची लागवड;
अहमदनगर-

तरुणाईचे प्रेरणास्थान असलेले दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा प्रथम स्मृतिदिन स्नेहालयात एका अनोख्या उपक्रमाने करण्यात आला. या निमित्ताने फळझाडे व औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. स्नेहालय संचालित युवा निर्माण प्रकल्पातर्फे आयोजित या कार्यक्रमात युवक बिरादरी संस्थेच्या विश्वस्त कांचनताई कांकरिया यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. कलाम यांनी तरुणाईसाठी दिलेली प्रतिज्ञा सुवालाल शिंगवी यांनी युवकांना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित परदेशी यांनी केले. तर या कार्यक्रमासाठी युवा निर्माण प्रकल्पाच्या अमृता जाधव, रत्ना शिंदे, प्रियांका आडे, उमिता चौगुले, विकास सुतार, भरत मोहळकर, गणोश दहिफळे, विष्णू आंबेकर, श्वेता इंगळे, मेघा थोरात यांनी परिश्रम घेतले.









