Archive Pages Design$type=blogging

नूतन महापौर व उपमहापौरांनी घेतला पद्भार

नूतन महापौर व उपमहापौरांनी घेतला पद्भार अहमदनगर :शिवसेना-भाजप नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत व महापालिकेच्या आवारात वृक्षारोपण कर...

नूतन महापौर व उपमहापौरांनी घेतला पद्भार
अहमदनगर :शिवसेना-भाजप नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत व महापालिकेच्या आवारात वृक्षारोपण करीत नूतन महापौर सुरेखा कदम व उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी काल गुरुवार दि. ७ रोजी सकाळी आपला पदभार स्वीकारला. यावेळी युतीच्या कार्यकर्त्यामध्ये आनंदाचे वातावरण होते. 
दि. २१ जून रोजी महापौरपदी शिवसेनेच्या सुरेखा संभाजी कदम यांची तर उपमहापौरपदी भाजपाचे श्रीपाद छिंदम यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यांच्या कार्यकाळास दि. १ जुलैपासून प्रारंभ झाला होता. मात्र युतीच्या नेत्यांच्या उपस्थितीतच पदग्रहण समारंभ संपन्न होणार होता. त्यामुळे नव्या पदाधिकार्‍यांच्या पदग्रहण सोहळ्यास विलंब झाला. अखेर काल या दोनही पदाधिकार्‍यांनी आपला पदभार.घेतला. 
सकाळी ११ वाजता महापालिकेच्या आवारात वृक्षारोपण करून त्यानंतर महापौर सुरेखा कदम यांनी पदभार घेतला. यावेळी राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी , अँड़ अभय आगरकर , सहसंपर्क प्रमुख डॉ. विजय पाटील, गटनेते संजय शेंडगे, नगरसेवक अनिल शिंदे, अनिल बोरुडे, गणेश कवडे, सुरेश तिवारी, विक्रम राठोड, भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम, नितीन बारस्कर यांच्यासह शिवसेना - भाजपा युतीचे पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते. महापौर पदाचा पदभार स्विकारल्यानंतर उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी पदभार स्वीकारला.           
 शहर विकासास कटिबध्द : उपमहापौर
केंद्रात व राज्यात आमची सत्ता असल्याने शहर विकासास आवश्यक असणार निधी आणण्यास प्रय▪केले जाणार आहेत. सेना-भाजप युतीच्या सत्तेच्या माध्यमातून शहर विकासाकरिता कटिबध्द आहे. शहरवासियांच्यादृष्टिने पाणी पुरवठा योजना महत्त्वाची असून फेज २ योजना कार्यान्वित करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे उपमहापौर श्रीपाद छिंदम म्हणाले.शहराचा चेहरा-मोहरा बदलणार: महापौर

शहरातील अनेक समस्या प्रलंबित असून त्या सोडवण्यासाठी प्रय▪करणार असून केंद्र शासनाची सर्वांसाठी घरे ही योजना राबवण्यावर भर देणार आहे. शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी प्रयत्नशील असून एमआयडीसातील खासगी कंपन्यांच्या माध्यमातून चौक सुशोभिकरण करणे, प्रशासकीय कामांना गती देणे, पाणी पुरवठा नियोजन व कचरा व्यवस्थापन या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष पुरवणार आहे. दर महिन्याच्या दुसर्‍या सोमवारी महिला नगरसेविकांना सोबत घेऊन प्रभागातील समस्या जाणून घेणार आहे. शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा मानस असल्याचे महापौर सौ. सुरेखा कदम म्हणाल्या

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: नूतन महापौर व उपमहापौरांनी घेतला पद्भार
नूतन महापौर व उपमहापौरांनी घेतला पद्भार
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjQtRqBFKKPLVuDTHERiINgB5ZZkg4pOJM26UnpSHP7HM1Uw7YUR9ebuj19jxoHZ37rFPCU5UPFJ195FeXS1fII659GxuuHYokuQGd56GIHrjagChyphenhyphens6HcfMF5GgjHKd4pvI9-1o-_twtc5/s320/pad.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjQtRqBFKKPLVuDTHERiINgB5ZZkg4pOJM26UnpSHP7HM1Uw7YUR9ebuj19jxoHZ37rFPCU5UPFJ195FeXS1fII659GxuuHYokuQGd56GIHrjagChyphenhyphens6HcfMF5GgjHKd4pvI9-1o-_twtc5/s72-c/pad.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago