Archive Pages Design$type=blogging

कोपर्डीची घटना मानवतेला कलंक

  र्डीची घटना मानवतेला कलंक : हजारे पारनेर /प्रतिनिधी-कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार...

 


र्डीची घटना मानवतेला कलंक : हजारे
पारनेर /प्रतिनिधी-कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना खूपच क्लेशदायक असून, मानवतेला कलंक लावणारी ही घटना आहे,अशी खंत •येष्ठ समाज़ेसेवक अण्णा हज़ारे यांनी केली आहे. याबाबत हजारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना खूपच क्लेशदायक असून, मानवतेला कलंक लावणारी ही घटना आहे. लोणी मावळाची घटना ताजी असतानाच पुन्हा अशी घटना घडावी, याचे अत्यंत दु:ख होते. ज्या लोकांनी हे दुष्कृत्य केले त्यांना अत्यंत फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. यामुळे अशा नराधमांना जरब बसू शकेल. त्यासाठी सरकारने प्राधान्याने शक्य ते सर्व प्रय▪करावेत. उज्‍जवल निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून हा खटला चालविण्याची तयारी दाखविल्याचे समजले. ही निश्‍चितच चांगली बाब आहे. अलिकडील काळात मानवतेच्या नावाखाली काही लोक फाशीच्या शिक्षेला विरोध करतात. परंतु जेव्हा मानवतेला काळिमा फासणार्‍या घटना घडतात.तेव्हा त्यातील पाशवी प्रवृत्तीला दया दाखविण्यात काहीच अर्थ नाही. हा खटला ज़लदगती न्यायालयात चालवून या दुर्दैवी घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशीचीच शिक्षा व्हावी. जेणोकरून पुढील काळात अशा प्रकारचे कृत्य करण्यास कुणी धजावणार नाही. समाजात महिला आणि मुलींची सुरक्षितता हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत आहे. यासाठी सरकार, पोलिस यंत्रणा आणि समाजाने अधिक दक्ष रहायला हवे. जेणोकरून अशा घटना घडणार नाहीत. तसेच अशा घटना घडल्यानंतर त्यावर वादविवाद न करता त्याकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पहायला हवे.व पीडित कुटुंबाला सामाजिक आधार द्यायला हवा, असे हज़ारे यांनी पत्रकात म्हटले आहे.
कोप


कोपर्डीची घटना मानवतेला कलंक 

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: कोपर्डीची घटना मानवतेला कलंक
कोपर्डीची घटना मानवतेला कलंक
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_0.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_0.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago