Archive Pages Design$type=blogging

रिप. रिप. युवकांकडून एन्जॉय!

रिप. रिप. युवकांकडून एन्जॉय! शहरात तीन दिवसांपासून संततधार : जनजीवन प्रभावित, तरी मोठय़ा पावसाची अपेक्षा अहमदनगर) : गेल्या तीन दिवस...


रिप. रिप. युवकांकडून एन्जॉय!
शहरात तीन दिवसांपासून संततधार : जनजीवन प्रभावित, तरी मोठय़ा पावसाची अपेक्षा
अहमदनगर) : गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या दमदार हजेरीमुळे शहरातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. पावसामुळे शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून, दैनंदिन कामे ठप्प झाली आहेत. या रिमझिम पावसाचा महाविद्यालयीन युवक-युवतींनी मात्र चांगलाच आनंद लुटला. पावसाने आराम न घेता पडावा, अशी शहरवासियांची अपेक्षा आहे.पावसाने गेल्या तीन दिवसापासून शहरात दमदार हजेरी लावली. सकाळी सत्रात गरमा वाढल्यानंतर पाऊस दुपारनंतर सुरू होतो. रिमझिम पाऊस दैनंदिन काम ठप्प करणार ठरत असला, तरी युवक-युवतींचे विशेष करून महाविद्यालयीन तरुणांची मन धुंद करणारा ठरली. महाविद्यालयातील युवक-युवती रस्त्याने जाताना पावसाचा आनंद घेत चालली होती. लालटाकी रस्त्यांवर असलेल्या महाविद्यालयातील तरुण-तरुणींची ही रपेट ज्येष्ठांना त्यांच्या तारुण्यांची आठवण करून देणारी ठरत होती. पावसाचा आनंद हा गरमा-गरम भजी आणि त्याबरोबर वाफळलेल्या चहाशिवाय नाही. पावसात भिजल्यानंतर एखाद्या हातगाडीवर कांदा भजी आणि चहा पिण्यासाठी युवकांची गर्दी होती. यात युवक-युवती एकत्र येऊन चहा पिताना दिसल्यावर त्यांच्यावर बघणार्‍यांच्या नजरा रोखत होत्या. यातच काही मित्र आपल्या मित्रांच्या अंगावर एखाद्या खड्डात साचलेले पाणी पायाने उडवून धिंगाणा घालत होती. दुचाकीवर पावसात भिजण्याचा आनंद वेगळाच. यात युवक-युवती मागे नव्हत्या. काहींच्या प्रेमांना यावेळी भरते आले होते. 
चितळे रस्त्यावरील भाजीपाला मार्केट या रिप.. रिपिने मात्र चांगलाच गोठला होता. काही भाजीविक्रेते छत्र्यांचा सहारा घेत ठाण मांडून होते. त्यातच एकादा ग्राहक छत्री वाकडी करून भाजीचा भाव विचारून पुढे जात होता. भाजी न घेतल्याचे दु:ख विक्रेत्याच्या चेहर्‍यावर लपून राहत नव्हते. रस्त्यावर झालेल्या चिडचिड अनेकांच्या चपला दाखवित होती. रबरी चपल घालून रस्त्याने फिरणार्‍यांच्या मागील बाजूस चिखलाचे डाग पडत होते. दुचाकीच्या मागे असलेल्या वाहनधारकांच्या अंगावर टायरमधून चिखलाचे डाग उडतानाचे चित्र या चिडचिडीमुळे दिसत होते. पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांची परिस्थिती देखील पावसासमोर मान टाकल्याचीच दिसत होती. शहरातील प्रत्येक रस्त्यावर पावसामुळे खड्डे दिसत आहेत. छोट्या खड्डय़ांनी मोठे रुप घेतले आहे. हे खड्डे पाण्याखाली असल्यामुळे वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होत होते. असे असले तरी पावसाची ही संततधार अशीच सुरू राहू दे, अशी अपेक्षा नगरकर व्यक्त करत होते. दुष्काळामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ात मोठी कपात झाली. कमी दाबाने पाणी येत असल्याने टंचाईला समोरे जावे लागले. शहरातील सदन भाग देखील यातून सुटला नाही. त्यामुळे रिप.. रिप.. का होईना पडतो ना, पडू दे अशा प्रतिक्रिया नगरकर व्यक्त करत पाऊस एन्जॉय करत होते.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: रिप. रिप. युवकांकडून एन्जॉय!
रिप. रिप. युवकांकडून एन्जॉय!
http://epunyanagari.com/epaperimages/28072016/28072016-md-ah-17-2254-2-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_10.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_10.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago