Archive Pages Design$type=blogging

'जय तुळजाभवानी युवा मंच अन्याय अत्याचाराविरोधात काम करणार'

'जय तुळजाभवानी युवा मंच अन्याय अत्याचाराविरोधात काम करणार'; अहमदनगर ; शहरातील तरुणांना एकत्रित करून छत्रपती शिवाजी महार...


'जय तुळजाभवानी युवा मंच अन्याय अत्याचाराविरोधात काम करणार';
अहमदनगर ;
शहरातील तरुणांना एकत्रित करून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजामध्ये पोहोचवण्याचे काम सर्व तरुण करणार आहेत. जय तुळजाभवानी युवा मंच ही राजकीय संघटना नसून एक सामाजिक संघटना आहे. या मंचच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची कामे करण्यात येणार आहेत. अन्याय अत्याचाराविरोधात संघटना करणार असल्याचे प्रतिपादन मंचाचे अध्यक्ष दिनेश लोंढे यांनी केले. सबजेल चौकात जय तुळजाभवानी युवा मंचच्या पहिल्या शाखेचे उद््घाटन दिनेश लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शाखाध्यक्ष राहुल गाढवे, उपाध्यक्ष प्रसाद रेणावीकर, संतोष दसासे, विष्णू कासार, युवराज शिंदे, नानासाहेब येनगुपटला, किरण सुपेकर, सागर बारस्कर, तुषार येनगुटपटला, रवींद्र घावटे, राहुल गारदे, चेतन शेलार, महेश बागले, नीलेश आगरकर, भैय्या शिंदे, राजू शिंदे, आकाश दळवी, योगेश सोनवणो उपस्थित होते. लोंढे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न मंचाच्या माध्यमातून सोडविले जातील. वृक्षारोपणाचा कार्यक्रम मंचाच्या माध्यमातून लवकरच हाती घेतला जाईल. नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी मनपाला जागे करण्याचे काम करू. उपाध्यक्ष प्रसाद रेणावीकर म्हणाले की, सबजेल चौकात जय तुळजाभवानी युवा मंचाची पहिली शाखा स्थापन झाली आहे. मंचाचे अध्यक्ष लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रश्न सोडविले जातील. यावेळी शिवराज आनंदकर यांचे भाषण झाले.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: 'जय तुळजाभवानी युवा मंच अन्याय अत्याचाराविरोधात काम करणार'
'जय तुळजाभवानी युवा मंच अन्याय अत्याचाराविरोधात काम करणार'
http://epunyanagari.com/epaperimages/27072016/27072016-md-ah-17-1897-1-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_114.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_114.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago