Archive Pages Design$type=blogging

रयत शिक्षण संस्थेच्या बांधकामास निधी देणार : ना. शिंदे

रयत शिक्षण संस्थेच्या बांधकामास निधी देणार : ना. शिंदे; ( रयत शिक्षण संस्थेच्या जामखेड तालुक्यातील जवळा येथील छत्रपती शिवाजी विद्याल...


रयत शिक्षण संस्थेच्या बांधकामास निधी देणार : ना. शिंदे;
(
रयत शिक्षण संस्थेच्या जामखेड तालुक्यातील जवळा येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या शाळा खोल्या बांधण्यासाठी जलसंधारणमंत्री प्रा.राम शिंदे यांनी ५0 लाख रूपयांचा निधी मिळवून देण्याचे आश्‍वासन सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दिले. 
रयत शिक्षण संस्थेने तालुक्यातील जवळा येथे सन १९६0साली सुरू केले. आज या विद्यालयात तब्बल १ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरम्यान ३0 वर्षापूर्वी जवळा ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शाळा खोल्या बांधल्या. परंतु या सर्व खोल्या मातीमध्ये बांधण्यात आल्याने, यातील काही खोल्या जमीनदोस्त झाल्या आहेत . तर काही खोल्या धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यास शाळेला सुट्टी द्यावी लागते. केवळ ५ वर्गखोल्या सुस्थितीत असल्याने याच वर्गामध्ये १00-१00 विद्यार्थी बसविण्याची वेळ येत आहे. आज शाळेला १0 वर्ग खोल्यांची आवश्य़कता असल्याने या खोल्या बांधण्यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी करण्याचा प्रय▪केला. परंतु दुष्काळी परीस्थितीमुळे लोकवर्गणी जमा होण्यास र्मयादा आल्याने, पालकमंत्री शिंदे यांनाच याबाबत गळ घालण्याचा निर्णय सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी घेतला. पालकमंत्री शिंदे यांनीही शाळेच्या दहा वर्ग खोल्या बांधण्यासाठी ५0 लाख रूपयांचा निधी मिळवून देण्याचे ठोस आश्‍वासन सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दिल्याने लोकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
या शिष्टमंडळात तंटामुक्त अभियानचे अध्यक्ष किसनराव मेहेर , ज्योती क्रांती मल्टिस्टेटचे अध्यक्ष आजीनाथ हजारे, माजी सरपंच किसनराव दळवी, जवळा सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पाटील, स्थानिक स्कूल समितीचे अध्यक्ष शहाजीराव पाटील,जेष्ठ कार्यकर्ते मारूती शिंदे,सरपंच अनिल पवार, ग्रामपंचायत सदस्य संतराम सूळ, काँग्रेसचे युवक कार्यकर्ते व स्थानिक स्कूल समितीचे सदस्य राजेंद्र राऊत, बाजीराव पठाडे ,राष्ट्रवादीचे दयानंद कथले ,रामलिंग हजारे, हबीब शेख , पोपट शिंदे, शब्बीर सय्यद, डॉ.पांडूरंग हजारे, युवराज आव्हाड , मतेवाडीचे सरपंच सुखदेव मते,लक्ष्मण लांडगे, जालिंदर मते, महेंद्र हजारे, अतुल हजारे यांचा समावेश होता

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: रयत शिक्षण संस्थेच्या बांधकामास निधी देणार : ना. शिंदे
रयत शिक्षण संस्थेच्या बांधकामास निधी देणार : ना. शिंदे
http://epunyanagari.com/epaperimages/30072016/30072016-md-ah-16-1605-1-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_12.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_12.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago