बुरुडगाव ते मनपा कचरा डेपो रस्त्याची दयनीय अवस्था; अहमदनगर ; मनपा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही बुरुडगाव रस्त्याकडे कोण...
बुरुडगाव ते मनपा कचरा डेपो रस्त्याची दयनीय अवस्था;
मनपा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही बुरुडगाव रस्त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून मोठी वाहतूक नियमितपणो सुरू असते. रस्ता खराब झाल्यामुळे वाहतूक मंदावली आहे. त्याचा या परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होत आहे. गावातील मुले शाळेत जाण्यास टाळाटाळ करतात. आयुक्तांनी मागील वर्षी पाहणी करून रस्ता करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या रस्त्याचे कामआजतागायत पूर्ण न झाल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत. दाद कोणाकडे मागावी हेच आता समजेनासे झाले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा कुठलाही इशारा न देता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे माजी सरपंच बापूसाहेब कुलट यांनी सांगितले.बुरुडगाव ते मनपा कचरा डेपोपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्ता तातडीने दुरुस्त करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी माजी सरपंच बापूसाहेब कुलट यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करून कचर्याची वाहने अडविली. या आंदोलनात संदीप पाचारणो, संकेत कुलट, कांचन मोढवे, अंजना मोढवे, सुभाष कुलट, उज्जवला पाचारणो, देऊबाई पाचारणो, सुमन पाचारणो, तारा मोढवे, कमल कुलट, मंगल तांबे, मनीषा कुलट, राजश्री पाचारणो, दत्तात्रेय शिंदे, रावसाहेब मोढवे, शकुंतला पाचारणो आदी सहभागी झाले होते.
रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर आरोग्य अधिकारी पैठणकर व वाघ यांनी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिल्यनंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला. रास्ता रोकोमुळे कचरा डेपोची सर्वच वाहने अडकली होती. या मार्गावरून दररोज सुमारे १00 कचरा डेपोची मोठी वाहने ये-जा करीत असतात. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे










