Archive Pages Design$type=blogging

अर्बन बॅंकेच्या एटीएम सुविधा, रुपे डेबिट कार्ड वितरण व मोबाईल अँपचे अनावरण

अर्बन बॅंकेच्या एटीएम सुविधा, रुपे डेबिट  कार्ड वितरण व मोबाईल अँपचे अनावरण; अहमदनगर ;ग्राहकांना काळानुरुप व अत्याधुनिक सेवा सु...



अर्बन बॅंकेच्या एटीएम सुविधा, रुपे डेबिट 
कार्ड वितरण व मोबाईल अँपचे अनावरण;
अहमदनगर ;ग्राहकांना काळानुरुप व अत्याधुनिक सेवा सुविधा देण्याच्या संकल्पनेतून आज शनिवार २३ रोजी बँकेच्या वैकुंठभाई मेहता सभागृहात दुपारी १ वाजता एटीएम सुविधा,रुपे डेबिट कार्ड वितरण व मोबाईल अँपचे अनावरण बिहारचे राज्यपाल महामहिम राम नाथ कोविंद यांच्या हस्ते तसेच महाराष्ट्राचे जलसंधारणमंत्री व नगरचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष खा.दिलीप गांधी यांनी दिली.
एटीएम सुविधा आणि बँकेकडून ग्राहकांना देण्यात येणारे रुपे डेबिट कार्ड हे देशभरातील सर्व बॅंकांच्या एटीएम व पॉज मशिनवर सहज वापरता येणार असून, यावर खातेदारांचे छायाचित्र असणार आहे. यामुळे ग्राहकांना आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून देखील त्याचा उपयोग होणार आहे. ग्राहकांना त्यांच्या ठेव अथवा कर्ज खात्याविषयीची सविस्तर माहिती या अँपद्वारे उपलब्ध होणार आहे. 
सभासद, खातेदारांच्या विश्‍वसनीय प्रतिसादाच्या पाठबळावर बॅंक निरंतर प्रगतीपथावर असून, या नवीन सुविधांमुळे ग्राहकांना अधिक फायदा होणार आहे. तसेच बिहारचे राज्यपाल येत असल्याने बॅंक खर्‍या अर्थाने मल्टिस्टेट दर्जाप्रमाणे देशपातळीवर पोहोचत असल्याचा आनंद व्हा.चेअरमन शैलेश मुनोत यांनी व्यक्त केला. तर १0६ वर्षाच्या वैभवशाली परंपरेत हा आणखी एक मानाचा तुरा असल्याचे ज्येष्ठ संचालक सुवालाल गुंदेचा यांनी सांगितले.
तरी सर्वांनी या अनोख्या कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: अर्बन बॅंकेच्या एटीएम सुविधा, रुपे डेबिट कार्ड वितरण व मोबाईल अँपचे अनावरण
अर्बन बॅंकेच्या एटीएम सुविधा, रुपे डेबिट कार्ड वितरण व मोबाईल अँपचे अनावरण
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEixIeGXAgb_wggH2gICXX1LgKcn9REPFHs6F_hwCWdf9Hme7QP9Gjtgn79uwz4NRZrDISFV5f0WhPlajzxakfwOORBpmTpwiOH-ex6Lf2kuVKGTi9Czm0J-9UtWWpCOflScQM863AaGaFmi/s200/logo.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEixIeGXAgb_wggH2gICXX1LgKcn9REPFHs6F_hwCWdf9Hme7QP9Gjtgn79uwz4NRZrDISFV5f0WhPlajzxakfwOORBpmTpwiOH-ex6Lf2kuVKGTi9Czm0J-9UtWWpCOflScQM863AaGaFmi/s72-c/logo.png
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_14.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_14.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago