Archive Pages Design$type=blogging

शहरातील केबलधारकांची संख्या घटली

शहरातील केबलधारकांची संख्या घटली; ■ शहरात कार्यरत असलेल्या सीटी केबल, ज्युपीटीयल आणि इनकेबल, या यंत्रणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे...


शहरातील केबलधारकांची संख्या घटली;
■ शहरात कार्यरत असलेल्या सीटी केबल, ज्युपीटीयल आणि इनकेबल, या यंत्रणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. महापालिका हद्दीतील यंत्रणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, याप्रमाणे जिल्ह्यातील यंत्रणांकडे नोटिसीव्दारे विचारणा केली जाणार आहे. अहमदनगर : सेट टॉप बॉक्स बसविल्यानंतर शहरातील केबलधारकांची संख्या वाढली आहे. मात्र बहुविध परिचालक यंत्रणांनी ही आकडेवारीच लपविण्याचा प्रयत्न चालविला असून, ही बाब जिल्हा करमणूक शाखेच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने फरकाची रक्कम भरण्याबाबतची नोटीस गुरुवारी बहुविध यंत्रणांना गुरुवारी बजावली आहे.
शहरासह जिल्ह्यातील केबलधारकांना सेट टॉप बॉक्स बसविणे सरकारने बंधनकारक केले आहे. सेट टॉप बॉक्स न बसविणार्‍या केबलधारकांचे दूरचित्रवाणी मध्यंतरी बंद करण्यात आले होते. त्यामुळे या मोहिमेला गती मिळाली आहे. परिणामी सेट टॉप बॉक्स बसविल्यानंतर केबलधारकांची संख्या वाढणे अपेक्षित होते. अपेक्षेप्रमाणे केबलधारकांची संख्या १५वरून २२ हजार झाली. तशी माहिती केंद्र सरकारकडून जिल्हा करमणूक शाखेस कळविण्यात आली आहे. करमणूक कर वसुलीसाठीही ही आकडेवारी गृहीत धरली जाणार आहे. असे असले तरी बहुविध परिचालक यंत्रणांनी यापेक्षाही कमी आकडेवारी सादर केली असून, सुमारे ३ हजार केबलधारकांचा फरक आहे. प्रति केबलधारक ४५ रुपये, याप्रमाणे कर वसूल करण्यात येतो. परंतु बहुविध यंत्रणांनी संख्या घटविल्यामुळे जिल्हा करमणूक शाखेने बहुविध यंत्रणांना यासंदर्भात नोटीस बजावली आहे. त्यामुळे प्रत्यक्षातील आकडेवारी सादर करणे बंधनकारक झाले असून, यामुळे करमणूक करात मोठी वाढ होणार असल्याचे प्रशासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले. 
केबलधारकांची संख्या कमी दाखवून लाखो रुपये कर बुडविण्यात आला आहे. मात्र ऑनलाईन प्रणालीमुळे कर बुडेगिरीला आळा बसला आहे. सेट टॉप बॉक्स बसविण्यापूर्वीची आणि त्यानंतरची संख्या, याचा हिशोब सध्या सरकारकडून मांडला जात आहे. सरकारची आकडेवारी आणि बहुविध यंत्रणांनी बसविलेले सेट टॉप बॉक्स, ही संख्या सारखी, आल्यानंतरच यातील त्रुटी दूर झाल्या आहेत, असे म्हणण्यास वाव आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही. अपेक्षेप्रमाणे केबलधारकांची संख्या वाढली खरी, पण बहुविध यंत्रणांनी ती कमी दाखविल्याने पहिले पाढे पंचावन्न, अशी स्थिती निर्माण झाली असून, बहुविध यंत्रणांना नोटिशीव्दारे विचारणा करण्यात आली आहे. त्यावर बहुविध यंत्रणा काय उत्तर देतात, यावरच पुढील कारवाईची दिशा ठरविली जाणार आहे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: शहरातील केबलधारकांची संख्या घटली
शहरातील केबलधारकांची संख्या घटली
http://epaper.lokmat.com/EpaperImages//ngr//2972016//d15819-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_155.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_155.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago