'पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवा; अहमदनगर नगर तालुक्यातील युवा सेना तालुकाध्यक्ष अविनाश कोतकर यांच्या नेतृत्वाख...
'पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवा;
अहमदनगर

नगर तालुक्यातील युवा सेना तालुकाध्यक्ष अविनाश कोतकर यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम करीत आहे. नवनियुक्त युवा सेनेच्या पदाधिकार्यांनी आपल्या परिसरात पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून समाजाची प्रश्न सोडविण्याची भुमिका बजवावी, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.
नगर तालुका युवा सेनेच्या नवनियुक्त पदाधिकार्यांना राठोड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, तालुकाध्यक्ष अविनाश कोतकर, शहर प्रमुख ऋषभ भंडारी, प्रसिध्दीप्रमुख राजेश भाटिया यासह शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी विक्रम राठोड म्हणाले की, शिवसेनेबरोबर युवासेनेला काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. त्याचे पदाधिकार्यांनी सोने करावे, नुतन पदाधिकार्यांमध्ये कैलास लांडे, किरण दळवी, सनी लांडगे, गणेश कुलट, राहुल गवारे यांचा समावेश आहे. नवनियुक्त पदाधिकार्यांचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, उपनेते अनिल राठोड, आ. विजय औटी, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, महापौर सुरेखा कदम, तालुका प्रमुख संदेश कार्ले, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम, युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी अभिनंदन केले









