मूकबधिर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप; अहमदनगर; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त टिळक रोडवरील मूकबधीर विद्यालय ये...
मूकबधिर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप;
अहमदनगर;

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त टिळक रोडवरील मूकबधीर विद्यालय येथे शिवसेना महिला आघाडीच्या शाखा नं.१ च्यावतीने खाऊचे वाटप महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते केले. यावेळी शिवसेनेच्या महिला प्रथम महापौर शीलाताई शिंदे, शाखेच्या अध्यक्षा अरुणा गोयल, प्रमिला गोयल, निता शिंदे, ज्योती गोयल, प्रा.कांता बोठे, आशा निंबाळकर, उषा ओझा, जगदाळे सर आदी उपस्थित होते.
प्रास्तविकात शाखाध्यक्षा अरुणा गोयल म्हणाल्या की, आम्ही सतत विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतो. त्यामध्ये वृक्षारोपण, नेत्र तपासणी शिबीर, रक्तगट तपासणी, शालेय विद्यार्थ्यांना मदत अशा विविध सामाजिक उपक्रमांचा त्यात समावेश असतो.
यावेळी कदम म्हणाल्या की, मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हे खरोखरच जिकिरीचे काम आहे, अशा विद्यार्थ्यांच्या सुख-दु:खात शिवसेना नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल. विद्यार्थ्यांना खाऊ वाटपचा उपक्रम आनंददायी असाच आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शहरात आपण चांगले काम करून आपल्या कामाचा ठसा उमटवू. ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सप्ताहभर आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









