चौथीच्या पाठय़पुस्तकात चुकीचा इतिहास; बालभारती अर्थात महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता ४ थीच्य...
चौथीच्या पाठय़पुस्तकात चुकीचा इतिहास;
बालभारती अर्थात महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता ४ थीच्या शिवछत्रपती पुस्तकात 'अफजल खान वधा'च्या चित्राच्या जागी 'छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाची गळाभेट घेण्यास जात आहेत' असे दिशाभूल करणारे चित्र प्रकाशित केले आहे. विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास शिकविणारे चित्र बदलून मूळ इतिहास शिकविला जावा, अशी मागणी करणारे निवेदन हिंदू जनजागृती समितीने राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यांना दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूद्वेषी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याला संपविले. या जाज्वल्य इतिहासाची मोडतोड करून याद्वारे छत्रपती शिवरायांचे शौर्य व पराक्रम सांगणारा इतिहास पुसण्याचे काम बालभारती करीत आहे. महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेऊन बालभारतीने त्वरित सर्व पुस्तके मागवून नव्याने अफजल खान वधाचे चित्र समाविष्ठ करावे, तसेच संबंधित इतिहासद्रौहय़ांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण सहसंचालक सुनील चव्हाण, बालभारतीचे इतिहास विषयाचे विशेष अधिकारी मोगल जाधव यांना भेटून दिले. या संदर्भात सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनात दिला आहे. यावेळी समितीचे राज्य समन्वयक सुनील घनवट, पराग गोखले, पंडित मोडक, राजभाऊ देशपांडे, चंद्रकांत भोसले, सुनीता खंडाळकर, शोभा शहा, विजय गावडे, देवेंद्र जांगळे आदी उपस्थित होते
|










