उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा आघाडीतर्फे सत्कार शहर आघाडीला विश्वासात घेऊन काम करणार अहमदनगर : शहराच्या विकासासाठी आम्ही सर्वजण ...
उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा आघाडीतर्फे सत्कार
शहर आघाडीला विश्वासात घेऊन काम करणार
अहमदनगर :शहराच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत. कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस-मनसे व अपक्ष नगरसेवकांना विश्वासात घेऊनच विकासाचे निर्णय घेतले जातील, असे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी सांगितले.
छिंदम यांचा कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रसे व अपक्ष नगरसेवकांतर्फेमाजी महापौर अभिषेक कळमकर व गटनेता संपत बारस्कर यांनी सत्कार केला. सभागृहनेता कुमारसिंह वाकळे, नगरसेवक सुवेंद्र गांधी, सुनील कोतकर, अविनाश घुले, विपूल शेटिया, मुजाहिद कुरेशी, नसीम शेख, बाळासाहेब पवार, फय्याज कुरेशी, आरिफ शेख, बाबासाहेब गाडळकर, जय भोसले, जितू गंभीर, सलीम शेख, अजिंक्य बोरकर, सागर गुंजाळ आदी उपस्थित होते.
शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी आपण महापौरपदाच्या काळात प्रामाणिक प्रय▪केले. शहराच्याच्या विकासासाठी ही आघाडी अशीच राहील, असे कळमकर यांनी यावेळी सांगितले. संपत बारस्कर यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
|
|