'शिक्षक भारती'चा एल्गार; अहमदनगर : राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सोमवार दि. १ ऑगस्टला शिक्षक भारती संघटनेच्यावतीने...
अहमदनगर : राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सोमवार दि. १ ऑगस्टला शिक्षक भारती संघटनेच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली.
अनुदानीत आश्रमशाळेत अतिरिक्त झालेल्या कर्मचार्यांचे काम नाही, वेतन नाही या धोरणानुसार जुलैमध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार वेतन थांबविण्यात आलेले आहे. राज्यभर आश्रम शाळेवर अतिरिक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खासगी अनुदानीत शाळा, माध्यमिक शाळा किंवा जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर तात्काळ समायोजन करून त्याचे पगार पूर्ववत सुरू करा, विद्यार्थी संख्येची संख्येची अट शिथिल करून प्रत्येक वर्गात २५ एवढीच विद्यार्थी संख्या असावी, त्यासाठी कायद्यात दुरूस्ती करण्यात यावी, राज्यात अनुदानीत अनेक शाळांच्या वरती विद्यार्थी संख्या घटत आहे. त्यामुळे ३५ विद्यार्थी संख्येची अट शिथिल करून ती २५ करण्यात यावी, आदी शिक्षक भारती संघटनेच्या मागण्या आहेत.
केंद्रीय कर्मचार्यांप्रमाणे ७ वा वेतन आयोग तात्काळ लागू करण्यात यावा आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. आमदार कपिल पाटील, अशोक बेलसरे, आप्पासाहेब जगताप, जितेंद्र आरू यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे गाडगे यांनी सांगितले










