Archive Pages Design$type=blogging

मनपाचे टक्केवारी व खड्डेयुक्त नामांतराचा इशारा

मनपाचे टक्केवारी व खड्डेयुक्त नामांतराचा इशारा; अहमदनगर- शहरात सर्वत्र खड्डेयुक्त रस्ते झाल्याने पिपल्स हेल्पलाईनच्यावतीने स्वातंत...


मनपाचे टक्केवारी व खड्डेयुक्त नामांतराचा इशारा;
अहमदनगर-
शहरात सर्वत्र खड्डेयुक्त रस्ते झाल्याने पिपल्स हेल्पलाईनच्यावतीने स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी महापालिकेचे टक्केवारी खड्डेयुक्त महापालिका नामंतर करणार असल्याचा इशारा अँड़कारभारी गवळी यांनी दिला आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे झाली. मात्र टक्केवारीमुळे एक दोनदा झालेल्या मोठ्या पाऊसाने सर्वच रस्ते वाहून गेली आहे. महापालिकेत नगरसेवकांनी स्वत:च्या मर्जीतल्या ठेकेदारांना कामे देऊन ठरलेली टक्केवारी वसूल केल्याने निकृष्ट दर्जाचे रस्ते नगरकरांना मिळाले आहे. हे निकृष्ट दर्जाचे रस्ते पावसाळ्यात काही दिवसातच वाहून गेल्याने नगरकरांना टक्केवारी महापालिकेच्या कामाची प्रचिती येऊन खड्डेमय रस्ते अनुभवयास मिळत आहे. काही ठिकाणी माती टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचा प्रकार चालू असल्याने चिखलमय रस्त्यात नागरिक घसरुण पडत आहे. शहरातील बालिकाश्रम व कोठी रस्ता वगळता सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. खड्डेमय रस्त्यामुळे अनेक लहान मोठे अपघात घडत आहे. सर्वच नगरकरांना पाठीच्या व्याधी सुरु झाल्या असून याला टक्केवारी महापालिकाच जबाबदार असल्याचा आरोप अँड़गवळी यांनी केला आहे.
महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व नासिक महसुल आयुक्त यांना आंदोलनाची पुर्वसुचना देण्यात आली असून, १३ ऑगस्टपर्यंन्त शहरातील खड्डे न बुजवल्यास महापालिकेचे टक्केवारी खड्डेयुक्त महापालिका नामांतर करण्यात येणार आहे. समाजात कॉन्टम डेमोक्रॉसी आनण्याचा भाग म्हणून हे आंदोलन करण्यात येत आहे. सत्ताधार्‍यांना जाब विचारुन कामाचा हिशोब घेतल्यानेच लोकशाही बळकट होणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. आंदोलनात अँड़कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रा.सुदाम देवखिळे, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, विठ्ठल सुरम, वीरबहादूर प्रजापती, सखाराम सरक, शाहिर कान्हू सुंबे, अंबिका नागूल, अंबादास दरेकर, अँड़संजय जव्हेरी आदिसह पिपल्स हेल्पलाईनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार .

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: मनपाचे टक्केवारी व खड्डेयुक्त नामांतराचा इशारा
मनपाचे टक्केवारी व खड्डेयुक्त नामांतराचा इशारा
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuXKkcId0fWQJctzeSpMjl2-I9989A1znHlAYUK_7bY9bCL_ouiE-SmIr-iD_GTXS1Tz7Rb1lvEpH1HfFXiMJtrZn97LY2H2m23e8Aq8Hf0-_ZK34xXkHGF1CxQf1jv-M-uFRrkqB0sQrh/s200/Lss+news.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuXKkcId0fWQJctzeSpMjl2-I9989A1znHlAYUK_7bY9bCL_ouiE-SmIr-iD_GTXS1Tz7Rb1lvEpH1HfFXiMJtrZn97LY2H2m23e8Aq8Hf0-_ZK34xXkHGF1CxQf1jv-M-uFRrkqB0sQrh/s72-c/Lss+news.png
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_221.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_221.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago