मुलींच्या संरक्षणासाठी प्रतिसाद मॅप महिलांनी धाडसी बनावे : पूजा बक्षी; अहमदनगर; पोलिस तुमचे मित्र आहेत. महिलांनी निर्भय व धाडस...
मुलींच्या संरक्षणासाठी प्रतिसाद मॅप
महिलांनी धाडसी बनावे : पूजा बक्षी;
अहमदनगर;

पोलिस तुमचे मित्र आहेत. महिलांनी निर्भय व धाडसी बनावे. शहरामधील मुलींच्या संरक्षणासाठी प्रतिसाद मॅप हे मोबाईल अँप सुरू करण्यात आले आहे. मुलींना आवश्यकता वाटल्यास प्रतिसाद मॅपवर प्रतिसाद शब्द टाईप केल्यानंतर पोलिस तेथे पोहोचू शकतील. मुलींनी दैनंदिन जीवनात कसे वागायचे, हे निश्चित केले पाहिजे. सुजय विखे व आयडियल तायक्वांदो ग्रुपने शहरात सुरू केलेली जनजागृती कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन निर्भय पथकाच्या प्रमुख पीएसआय पूजा बक्षी यांनी केले.
सुजय विखे व आयडियल तायक्वांदो ग्रुपच्या वतीने न्यू आर्टस् महाविद्यालयात मिशन स्वयंसिद्ध कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन करताना बक्षी बोलत होत्या. याप्रसंगी प्राचार्य झावरे, माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब भुजबळ, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सविता मोरे, संध्या मेढे, संपूर्णा सावंत, शारदा पवार, मंगल भुजबळ, मुन्ना चमडेवाले, सानप आदी उपस्थित होते. बाळासाहेब पवार म्हणाले की, मुलींनी स्वत:चे संरक्षण करण्यासाठी तयार राहिले पाहिजे. आपल्या संस्कृतीनुसार मुलींनी वागावे. धाडस निर्माण करून त्रास देर्णायाला धडा शिकवावा. निखील वारे म्हणाले की, मुलींनीही समाजात वागताना काही गोष्टींची जाणीव ठेवायला हवी. आपण शिक्षणासाठी शहरामध्ये येत आहोत. शिक्षणाकडेच लक्ष दिले पाहिजे. कोणी नाहक त्रास देत असेल, तर त्याला धडा शिकवण्याचे आपण सर्वजण करू, असे ते म्हणाले. सविता मोरे म्हणाल्या की, निर्भय पथकाच्या प्रमुख पूजा बक्षी यांनी महाविद्यालय परिसरात जे काम सुरू केले आहे. ते कौतुकास्पद आहे. मुलींनी आता न घाबरता बक्षी यांना सहकार्य करावे व गुंड प्रवृत्तींविरोधात एकत्रितपणो लढा द्यावा, असे सांगितले.









