माळीवाड्याचा विकासकामातून चेहरामोहरा बदलेल : सौ. घुले; अहमदनगर - माळीवाडा भाग हा जुने शहर असून, या शहरामध्ये गेल्या ५0 ते ६0...
माळीवाड्याचा विकासकामातून
चेहरामोहरा बदलेल : सौ. घुले;
अहमदनगर -
![]()
माळीवाडा भाग हा जुने शहर असून, या शहरामध्ये गेल्या ५0 ते ६0 वर्षांपूर्वी अंतर्गत लाईनचे काम झाले असून, आता प्रभागामध्ये नव्याने अंतर्गत लाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. महापालिकेकडे प्रभागातील विविध विकासकामे मंजूर असून, ही कामे आता मार्गी लागणार आहेत. आ. संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकासनिधीतून प्रभागामध्ये रस्ता डांबरीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पावसाळा संपल्यानंतर ही कामे मार्गी लागणार आहेत. मुलभूत योजनेतूनही बंद पाईप गटार व रस्ता काँक्रिटीकरण कामेही प्रभागामध्ये होणार असून, प्रभागाचा आता संपूर्ण विकास होणार आहे. त्यामुळे माळीवाड्याचा चेहरामोहरा बदलेल, असे प्रतिपादन नगरसेविका नीता घुले यांनी केले.
नगरसेविका सौ. घुले यांच्या प्रयत्नातून माळीवाड्यातील गोंधळे गल्ली येथे बंद पाईप गटार व काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ लीलाबाई जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी स्थायीचे माजी सभापती अविनाश घुले, सुशीला कुल्लाळ, ताराबाई चिपाडे, अश्विनी कुल्लाळ, लक्ष्मी श्रीराम, मंगल अंबेकर, जयसिंग राऊत, रचना भापकर, माधुरी शिंगरे, लता काळे, अलका कोकाटे, जयश्री लोळगे, चंद्रकला लोळगे, साधना सपाटे, कल्पना गायकवाड, शोभा घोरपडे, अर्जुन भापकर, नंदू राऊत, गोरख चिपाडे, अविनाश सपाटे आदींसह नागरिक उपस्थित होते.
श्री. घुले म्हणाले की, नागरिकांच्या सहकार्यामुळे प्रभागाला मोठा निधी आणू शकलो. गेल्या अनेक दिवसांपासूनचे प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागणार आहेत. पुढील २0 ते २५ वर्षांचा विचार करून प्रभागातील नागरिकांनी दज्रेदार कामे करून घेण्यासाठी सहकार्य करावे, असे ते म्हणाले.
|










