डॉ.अनभुले हॉस्पिटलच्या मधुमेह प्रशिक्षण शिबिरास नगरकरांचा प्रतिसाद ; २५ वर्ष रुग्णसेवा करणार्या डॉक्टरांचा सत्कार 'मधुमेहाला न घ...
डॉ.अनभुले हॉस्पिटलच्या मधुमेह प्रशिक्षण शिबिरास नगरकरांचा प्रतिसाद ; २५ वर्ष रुग्णसेवा करणार्या डॉक्टरांचा सत्कार
'मधुमेहाला न घाबरता त्यावर नियंत्रण मिळवा'
अहमदनगर;
![]()
मधुमेहाला न घाबरता त्याचा स्वीकार करुन, त्यावर नियंत्रण मिळवण्याचे शिका. जो संकटाचा सामना करतो तोच यशस्वी होतो. जो दमून जातो तो संपून जातो. आजारापुढे हार न मानता त्याच्याशी सामना करण्याचा सल्ला माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी दिला.
डॉ.अनभुले हॉस्पिटल, स्टार आय.सी.यू. स्पेशालिटी अँण्ड जनरल केअर युनिटच्या वतीने माऊली संकुल सभागृहात आयोजित मोफत मधुमेह प्रशिक्षण शिबिराच्या उद््घाटन प्रसंगी पाचपुते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ.रावसाहेब अनभुले, डॉ.गोपाल बहरुपी, डॉ.सुधीर बोरकर, डॉ.रणजीत सत्रे, डॉ.भूषण अनभुले, डॉ.दीपाली अनभुले, डॉ.योगीता सत्रे उपस्थित होत्या.
पाचपुते म्हणाले की, भविष्यात भारत हा मधुमेहरुग्णांची राजधानी असलेला देश ठरणार आहे. माणसांचे राहणीमान व आहार बदलल्याचे दुष्परिणाम समोर येताना दिसत आहे. या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना दिशा देण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
|










