भ गवान विद्यालयात कोपर्डी घटनेचा निषेधगुरुपौर्णिमा साजरीबालमटाकळी /; शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील श्री भगवान विद्यालयात गुरुप...
भगवान विद्यालयात कोपर्डी घटनेचा निषेधगुरुपौर्णिमा साजरीबालमटाकळी/; शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील श्री भगवान विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. तसेच कोपर्डी येथील घटनेचा विद्यालयाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी श्रीक्षेत्र काशी केदारेश्वर येथील महंत हभप बाबागिरी महाराज यांनी केले. अध्यक्षस्थानी शाळेचे प्रा. क्षीरसागर सर होते. या वेळी महाराज म्हणाले, अध्यात्मामुळे समाजात प्रेमभाव निर्माण होतो. नैतिक आचरणाची सवय लागते. आदरभाव निर्माण होतो. आध्यात्माची शिकवण नसल्यामुळेच कोपर्डीसारख्या घटना घडतात. या वेळी महाराजांचा प्रा. अशोक क्षीरसागर यांच्या गौरवग्रंथ देवून सन्मान करण्यात आला. सर्व शिक्षकांचा गुलाबपुष्प देवून महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. राजेंद्र मराठे यांनी केले प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांच्या वतीने महेश मोरे, कल्याणी बागडे, कार्तिक घोगडे, चेतना संचेती यांची तर शिक्षकांच्या वतीने जोशी सर, आंधळे सर यांनी मार्गदर्शन केले. प्रा.क्षीरसागर यांनीही मार्गदर्शन केले.
कोपर्डी येथील घटनेचा बालकवयित्री अस्मिता मराठे हिने जाहीर निषेध केला. या वेळी कोपर्डी घटनेचा निषेध व्यक्त करून निर्भयास भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. श्री. मराठे यांनी आभार मानले.










