सई काळे हीचे बॅडमिंटनमध्ये यश अहमदनगर ; ज्ञानसंपदा स्कूल इंग्लिश मीडियम शाळेच्या इयत्ता आठवीतील सई काळे हिने जिल्हा बॅडमिंटन चॅम्प...
सई काळे हीचे बॅडमिंटनमध्ये यश

अहमदनगर ;
ज्ञानसंपदा स्कूल इंग्लिश मीडियम शाळेच्या इयत्ता आठवीतील सई काळे हिने जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होवून विजय नोंदविला. हे सर्व सामने वाडियापार्क येथे बॅडमिंटन हॉलमध्ये बॅडमिंटन असोसिएशनने आयोजित केले आहेत.सई काळे हिचे १७ वर्षाखालील व १९ वर्षाखालील आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत निवड झाली आहे. तसेच दि.८ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथील जिल्हा बॅडमिंटन महिला संघात पहिल्यांदाच निवड झाली आहे. सईने मिळवलेल्या यशाबद्दल तिचा पालकांनी, सर्व शिक्षकांनी, मुख्याध्यापिकांनी, संस्थेच्या विश्वस्तांनी कौतुक केले. सई ही प्रसिध्द सी ए राजेंद्र काळे व नगरसेविका सौ. मनिषा बारस्कर-काळे यांची कन्या आहे.









