पालक - शिक्षक संघ व माता पालक संघाची स्थापना; अहमदनगर : शाळेच्या भौतिक, शैक्षणिक व विद्यार्थी विकासाच्या संदर्भातील समस्या सोडविणे...
पालक - शिक्षक संघ व माता पालक संघाची स्थापना;
अहमदनगर : शाळेच्या भौतिक, शैक्षणिक व विद्यार्थी विकासाच्या संदर्भातील समस्या सोडविणे व पालकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी शासननिर्णयानुसार वि.ल. कुलकर्णी प्राथमिक शाळेत उपस्थित पालक सभेतून पालक शिक्षक संघ व माता पालक संघाची स्थापना केली. सभेचे प्रास्ताविकात शाळेच्या मुख्याध्यापिका धिमते यांनी पालक शिक्षक संघ व माता पालक संघाची उद्दिष्टे व्यक्त केली. उपस्थित पालकांमधून पालक शिक्षक संघ व माता पालक संघ सदस्यांची निवड केली. याप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सभेचे अध्यक्ष संस्थेचे सहकार्यवाह रुगणवाल व प्रमुख अतिथी एडीसीसी बॅंकेचे शाखाधिकारी त्रिमुखे यांच्या हस्ते संघातील नवृत्त झालेल्या पालक सदस्यांना गुलाबपुष्प देवून त्यांचा सत्कार केला. सभेचे प्रमुख अतिथी त्रिमुखे यांनी प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याच्या बाबतीत सतत जागरुक राहुन त्याचा शारीरिक,बौध्दीक विकास घडवून आणावा या निर्णयाच्या टिप्स देवून मार्गदर्शन केले.










